पॉलला मरनोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 17:03 IST
भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचा दिवगंत मुलगा कापारो ग्रुपचे माजी सीईओ अंगद पॉल यास ब्रिटनच्या एका व्यापरी संघाने मरणोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्डने सन्मानित केले आहे.
पॉलला मरनोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्ड
भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचा दिवगंत मुलगा कापारो ग्रुपचे माजी सीईओ अंगद पॉल यास ब्रिटनच्या एका व्यापरी संघाने मरणोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्डने सन्मानित केले आहे. लॉर्ड पॉचा पंणतू आरष पॉलने ब्रिटनच्या भारतीय उच्चायुक्त नवतेज सरना यांच्यासह अनेक नामांकित मान्यवरांच्या उपस्थितीत एशियन बिझनेस अवार्डसच्या दरम्यान ब्रिटनची खासदार सीमा मल्होत्रा यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. या समारंभाचे आयोजन एशियन मीडिया अॅण्ड मार्केटिंग ग्रुपचे एडिटर इन चीफ रमणीकलाल सोळंकी यांनी केले होते. यावेळी सीमा मल्होत्राने सांगितले की, अंगद पॉल व्यापारी जगतातले प्रतिभावान व्यक्ती होते. वयाच्या ३२ व्या वर्षीच त्यांनी संपुर्ण व्यवसाय सांभाळण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.