पराशर कुलकर्णी ठरले कॉमनवेल्थ लघुकथेचे विजेते
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:14 IST
‘कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राईज’चे विजेते ठरलेले पराशर कुलकर्णी अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय ठरले.
पराशर कुलकर्णी ठरले कॉमनवेल्थ लघुकथेचे विजेते
‘कॉमनवेल्थ शॉर्ट स्टोरी प्राईज’चे विजेते ठरलेले पराशर कुलकर्णी अशी कामगिरी करणारे पहिले भारतीय ठरले.सुमारे चार हजार लघुकथांमूधन त्यांच्या ‘काऊ अँड कंपनी’ या कथेची 5 हजार पाउंड (4.85 लाख रु.) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे ही त्यांनी लिहिलेली पहिलीच कथा आहे.सिंगापूर येथील येल एनयूएस कॉलेमध्ये सामाजिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक असणाऱ्या पराशर कुलकर्णी यांना मॅन बुकर प्राईज विजेते लेखक मार्लन जेम्स यांच्या हस्ते कॅलाबॅश लिटररी फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.या लघुकथेमध्ये चार माणसं च्युर्इंग गमच्या एका जाहिरातीमध्ये झळकलेल्या गाईचा शोध घेतात.प्रमुख परीक्षक जिलियन स्लोवो म्हणतात की, नव्वदच्या दशकातील सामाजिक परिस्थिती व जीवनपद्धती विनोदाच्या स्वरुपात डोळ्यासमोर उभी करण्याची त्यांची विलक्षण हातोटी खरंच वाखण्याजोगी आहे.विविध 47 देशांमधून सुमारे चार हजार लघुकथा या स्पर्धेत होत्या. कॉमनवेल्थ समुहातील देशातील लेखकाच्या सर्वोत्कृष्ट इंग्रजी अप्रकाशित लघुकथेसाठी हा पुरस्कार दिला जातो. कुलकर्णी म्हणाले की, नव्या लेखकांना यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. पुरस्कारामुळे पुढे लिहिण्याची प्रेरणा मिळाली.