'लुक्से' लाईफस्टाईल एक्स्पोचे नागपुरात आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:12 IST
अशाच शौकिनांसाठी नागपुरात एएमव्ही कॉन्सेप्ट सोल्युशनच्या वतीने 'लुक्से' या लाईफस्टाईल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे
'लुक्से' लाईफस्टाईल एक्स्पोचे नागपुरात आयोजन
आपली लाईफस्टाईल लक्झरिअस असावी असे, प्रत्येकाला वाटत असते. लक्झरिअस लाईफस्टाईलचे शौकिन हा आनंद अगदी भरभरून जगण्यासाठी जगाला प्रदक्षिणा घालायलाही मागे- पुढे पाहत नाहीत. त्यांचे जीवन नित्य नव्या आव्हानासह सुरू होते व ते पूर्ण केल्याशिवाय त्यांना चैनही पडत नाही. अशाच शौकिनांसाठी नागपुरात एएमव्ही कॉन्सेप्ट सोल्युशनच्या वतीने 'लुक्से' या लाईफस्टाईल एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल रेडिसन ब्लू येथे 7 व 8 नोव्हेंबर रोजी आयोजित हे प्रदर्शन मध्य भारतातील सर्वांत मोठे लक्झरिअस प्रदर्शन असणार आहे. देश-विदेशातील नामांकित बॅ्रण्ड व त्यांची उत्पादने येथे जवळून पाहता येतील.लुक्से या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी या प्रदर्शनातील 27 ब्रॅण्डस्ना पाहण्यासाठी नागपूर व मध्य भारतातील सुमारे 8 हजार लोकांनी आपली हजेरी लावली होती. यावेळी आयोजित केल्या जाणार्या एक्स्पोमध्ये 50 ब्रॅण्डस् आपली उत्पादने प्रसिद्धी व विक्रीसाठी ठेवणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा समावेश असेल. मिनी कुपर, डीसी अवांती, मेर्सेडिझ बेन्झ, इंडियन मोटरसायकलस्, डुक्काटी, ट्रम्प, डीएसके, पोलारिस, फ्रिगो, आयओ वॉक, सिग्नीचर फर्निचर, अ्रॅब्रोसिया फार्म्स, ब्रुग्सवर्क स्टुडिओ आर्ट गॅलरी, ईरोग्रोनॉमिक्स लक्झरी फर्निचर, 3डी सेल्फी, अँरिक जेम्स, द फॅशन बोट, वेव, इथोस, द वोयाज ट्रॅव्हल विद रॉयल कॅरेबियन, टुरिझम फिजी, टी टेस्टिंग, ग्रोव्हर झंपा, वाईनयार्डस या शिवाय असंख्य ब्रॅण्ड यावेळी पाहायला मिळतील.नागपुरातील लोकांमध्ये लाईफस्टाईल विषयी आकर्षण वाढले आहे. केवळ लक्झरी कार विषयी बोलायचे झाले तर सुमारे 100 कोटींचा व्यवसाय होतो. यासह अन्य लाईफस्टाईल विषयक वस्तूंचा विचार केल्यास हा बाजार आणखीच मोठा होतो व तो सुमारे 200 कोटींच्याआसपास पोहचतो. नागपुरात उपलब्ध असलेल्या ब्रॅण्डशिवाय हा व्यवसाय केला जात आहे. नागपुरातील लोकांच्या आवडीनिवडी बदलत आहेत. घरातील हॉलमध्ये चांगले पेंन्टिग असावे असे सर्वांना वाटते. मात्र नागपुरात अशा पेंटिंग्स मिळत नाहीत. लोकांच्या खाण्या- पिण्याच्या आवडी बदलू लागल्या आहेत, त्यांना काही नवे ट्राय करावे असे वाटायला लागले आहे. मात्र अनेकदा ती आवड पूर्ण होत नाही. कपडे, रत्न व ज्वेलरीच्या बाबतीतही असाच अनुभव आहे. ही उणीव भरून काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. एन्टिक वस्तूंचा शौक बाळगणार्यांसाठी देखील हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे.Photo Source : Nagpur Today