शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​सैफ अली खानची ‘ही’ अविवाहित बहीण आहे २७०० कोटींची मालकिण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 13:18 IST

सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्ट्यांपासून कायम दूर राहणारी, हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान यांना सर्वचजण ओळखतात. मात्र  सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्ट्यांपासून कायम दूर राहणारी त्यांची धाकटी मुलगी सबा अली खान हिच्याविषयी फारसे कुणाला काही ठाऊक नाही. विशेष म्हणजे सबा अली खान २७०० कोटींची मालकिण आहे. फॅमिली फंक्शन शिवाय ती कोणत्याच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नाही. सबा आता ४१ वर्षांची असून अद्याप ती अविवाहित आहे. पतौडी घराण्यातील अनेक जण बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. पण सबा सिनेसृष्टीपासून कायम लांब राहिली. याचे कारण म्हणजे तिचा लाजाळू स्वभाव आहे. एका मुलाखतीत स्वत: सबाने सांगितले होते, की कधीही मी सिनेसृष्टीत येण्याचा विचार केला नाही. मी जे काम करतेय, त्यात मी आनंदी आहे.  सबा अली खान ही ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वत:चा बिझनेस आहे. काही दिवसांपूर्वीच तिने डायमंड चेन सुरु केली आहेत. इतकेच नाही तर सैफने करीनाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सबाला तिच्यासाठी एक सुंदर डायमंड सेट डिझाइन करायला सांगितला होता.सबा भोपाळच्या औकाफ-ए-शाहीची प्रमुख आहे. भारत सरकार आणि भोपाळ संस्थानचे तत्कालीन नवाब हमीदुल्ला खां यांच्यात झालेल्या करारानुसार,  औकाफ-ए-शाहीवर वक्फ बोर्डचा हक्क राहणार नसल्याचे ठरले होते. नवाब घराण्याची ही एक स्वतंत्र संस्था आहे. सरकारच्या करारानुसार, औकाफ-ए-शाहीचा प्रमुख हा भोपाळच्या नवाब किंवा पतौडी घराण्यातूनच असेल. औकाफ-ए-शाही जवळ कोट्यवधीची संपत्ती आहे.४१ वर्षीय सबाचे अद्याप लग्न झालेले नाही. ती स्वतंत्रपणे स्वत:चा व्यवसाय सांभाळत आहे. औकाफ-ए-शाहीची प्रमुख असल्याने सबा पतौडी घराण्याच्या संपत्तीचा लेखाजोखा ठेवते. सैफ-सोहाप्रमाणे लाइमलाइटमध्ये न येतादेखील ती अतिशय बिझी असते. सबाची बहीण सोहा अली खानचे अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न झाले आहे.  Also Read : ​संतापला ‘डॅड’ सैफ अली खान; लेकीच्या बॉलिवूड डेब्यूला माझा विरोध का असेल?