शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

​OMG : कमाई कमी तरी "या" कारणाने तरुणाई करते जास्त खर्च !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 18:26 IST

नुकतेच याबाबत एक संशोधन करण्यात आले असून त्यात, कमी पगार असलेले लोक या कारणासाठी जास्त पैसे खर्च करतात, जाणून घ्या काय आहे ते कारण...!

आज चित्रपटसृष्टीचे पडसाद तरुणाईवर एवढ्या मोठ्या प्रमाणात उमटत आहेत की, स्वत:ची मिळकत अगदी कमी असूनही आपण सेलेब्ससारखे दिसावे, त्यांच्यासारखी आपली राहणीमान असावी आणि स्वत:ला श्रीमंत समजण्यासाठी आजची तरुणाई खूप मोठा खर्च करताना दिसत आहे. नुकतेच याबाबत एक संशोधन करण्यात आले असून त्यात, कमी पगार असलेले लोक स्वत:ला श्रीमंत दाखवण्यासाठी जास्त पैसे खर्च करतात.यूसीएल स्कूल आॅफ मॅनेजमेंटतर्फे करण्यात आलेल्या अध्ययनाचे सह-लेखक जो ग्लेडस्टोन यांनी सांगितले की, जेव्हा लोक मर्यादित साधनांमध्ये आपल्या गरजा भागवत असतात तेव्हा ते आपले राहणीमान व व्यक्तिमत्वाकडे अधिक लक्ष देतात. यावरून स्वत:ला हाय स्टँडर्ड दाखवण्याच्या नादात असे लोक कुठल्या आर्थिक अडचणींचा सामना करतात हे जाणून घेण्यास मदत होते.  मानसिक आरोग्य विज्ञान या पत्रिकेत प्रकाशित या संशोधनानुसार जे लोक कमी कमावतात त्यांना समाजात आपले स्थान कमी वाटते. याची भरपाई करण्यासाठी हे लोक स्वत:ते स्टेटस वरचढ दाखवणाऱ्या वस्तूंमध्ये जास्त पैसे खर्च करतात. यापूर्वीच्या संशोधनात आढळले की, जे लोक अधिक सामाजिक असतात त्यांना आपले सोशल स्टेटस मेंटेन करण्याची जास्त आवड असते. परंतु नवीन संशोधनात या गोष्टीवर भर दिला की, सोशल स्टेटस मेंटेन करण्याकडे त्या लोकांचा अधिक भर असतो ज्यांची कमाई सामान्यत: कमी असते. ब्रिटनच्या एका बहुराष्ट्रीय बँकेच्या सहयोगाने हे संशोधन करण्यात आले. ग्राहकांना एक मानक व्यक्तिमत्व प्रश्नावली विचारण्यात आली. यातील उत्तरे बँकेच्या व्यवहाराशी जुळवून निष्कर्ष काढण्यात आले. या संशोधनात १२ महिने ७१८ ग्राहकांच्या हजारो देवणा-घेवाणींचे विश्लेषण करण्यात आले. वय, लिंग, रोजगाराची स्थिती इत्यादी अन्य कारणे लक्षात घेऊन निष्कर्ष काढण्यात आला. यावेळी निष्कर्ष अचूक येण्यासाठी नगदी व्यवहारदेखील लक्षात ठेवण्यात आला. प्रत्येक व्यक्तीचे खर्चाचे आकडे एक (लो स्टेटस) अंकापासून पाच अंकी (हाय स्टेटस) आकड्यांपर्यंतच्या श्रेणीत क्रमबद्ध करण्यात आले. हाय स्टेटस लोकांच्या श्रेणीत विदेशी विमान प्रवास, गोल्फ, इलेक्ट्रॉनिक्स व कला संस्था यांचा समावेश होता, तर लो स्टेटस श्रेणीत सावकार, साल्वेज यार्ड व डिस्काउंट स्टोअरचा समावेश होतो. यावरून लक्षात येते की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना दिखाऊपणा करण्याची सवय नसते. परंतु ज्यांची कमाई कमी आहे ते स्वत:ला आपण हाय स्टेटसचे असल्याचे दाखवण्याच्या नादात आपले बँक बॅलन्स उडवतात.