शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

OMG : ​जास्त इंग्रजी बोलणाऱ्या मुली नको रे बाबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 18:33 IST

कोणत्या कारणांनी मुलांना जास्त इंग्रजी बोलणाऱ्या मुली आवडत नाहीत, जाणून घ्या...!

सध्या इंग्रजी बोलण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत असून बऱ्याच हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये सर्रास इंग्रजीचा वापर करण्यात येत आहे. त्यात संवादापासून चित्रपटांचे बरेच शिर्षक इंग्रजी असल्याचे आढळले आहे. एकंदरीत आपण इंग्रजीला ‘विंडो आॅफ दी वर्ल्ड’ समजतो. त्यामुळे सध्या इंग्रजीत बोलणे केवळ ट्रेंड नव्हे तर गरज होऊन बसले आहे. तुम्ही कुठेही जाता, इंटरव्युव देता किंवा दहा लोकांमध्ये बसलेले असता तेव्हा तुमची योग्यता व बुद्धिमत्ता यांची पारख तुमच्या इंग्रजीवरून केली जाते. यासाठी बरेचजण इंग्लिश स्पिकिंगचे कोर्सही जॉईन करतात. मात्र एका नव्या संशोधनात, पुरुषांना जास्त इंग्रजी बोलणाऱ्या मुली आवडत नाहीत असे आढळून आले आहे.  नुकतेच एका सर्वेक्षणात आढळले आहे की भारतीय पुरूषांना आजूनही साध्या-सरळ घरगुती मुली आवडतात. इंग्रजी बोलणाऱ्या मुली त्यांना आवडत नाही.  पुरुषांचे मत आहे की इंग्रजी बोलणाऱ्या मुली आत्मनिर्भर असतात. परंतु त्यांच्यामध्ये फार अहंकार असतो. त्या स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. त्या आपले कुटुंब व नवऱ्यापेक्षा स्वत:ला वरचढ समजतात. या सर्वेक्षणात पुढे आलेली आणखी एक बाब म्हणजे अशाच मुलांना इंग्रजी बोलणाऱ्या मुली आवडतात ज्यांना स्वत:ला चांगले इंग्रजी बोलता येते. तसे पाहिले तर बदलत्या काळासोबत इंग्रजी बोलणे आवश्यकच आहे मात्र ज्यांना इंग्रजी येत नाही ते स्वत:ला कमकुवत समजतात.