OMG : महिलांना आवडतात असे पुरुष !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 12:41 IST
जर आपणास एकही मैत्रिण नाही, आणि आपण जर या कारणाने दु:खी असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही.
OMG : महिलांना आवडतात असे पुरुष !
जर आपणास एकही मैत्रिण नाही, आणि आपण जर या कारणाने दु:खी असाल तर आता चिंता करण्याची गरज नाही. एका अभ्यासानुसार, महिलांना डिओड्रंट लावणारे पुरुष अधिक आकर्षक वाटतात. यामुळे हे संशोधन आपणासाठी मदतगार ठरु शकते. युनिव्हर्सिटी आॅफ स्टरलिंगच्या मानसोपचारतज्ज्ञांनी या संशोधनासाठी १३० महिला आणि पुरुषांना काही फोटोग्राफ्स दाखविले आणि त्यांना त्या फोटोंच्या आधारे मॅस्क्यलिनटी आणि फेमनिनिटीचा अंदाज लावायला लावला. त्यानंंतर २३९ पुरुष आणि महिलांना सुगंधीत वासाच्या आधारे जज करण्याचे सांगण्यात आले. तज्ज्ञांना असे आढळून आले की, महिला पुरूषांच्या तुलनेने सुगंधीत वासाकडे जास्त आकर्षक होतात. शिवाय पुरुषही सुगंधी प्रसाधने लावणाऱ्या महिलांकडे आकर्षित होतात.