OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2017 13:03 IST
यावेळी IPL दरम्यान काही क्रिकेटर्सच्या पत्नींवर विशेषत: त्यांच्या गर्लफ्रेंड्सवर कॅमेरांची विशेष नजर असेल.
OMG : यावेळी IPL दरम्यान क्रिकेटरांच्या हॉट गर्लफ्रेंड्स/पत्नींवर असेल कॅमेरांची नजर !
-Ravindra Moreकोणत्याही मोठ्या टुर्नामेंटच्या मैदानावरील दर्शकांच्या गर्दीवर कॅमेरे फिरत असतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे क्रिकेटर्सच्या गर्लफ्रेंड्स आणि त्यांच्या पत्नींची मैदानात हजेरी लावणे होय. कारण तिथे ह्या क्रिकेटर्सना चीयर्स करण्यासाठी आलेल्या असतात. यावेळीदेखील काही क्रिकेटर्सच्या पत्नींवर विशेषत: त्यांच्या गर्लफ्रेंड्सवर कॅमेरांची विशेष नजर असेल. क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्रकार पत्नी मयंती लेंगर क्रि केटर्सच्या पत्नींमध्ये मगाशी सर्वात जास्त चर्चेत राहीली होती. स्पोर्ट रिपोर्टर मयंती आपल्या ग्लॅमरस अंदाजाने ओळखली जाते. यावेळीदेखील तिचा हॉट लूक दर्शकांपर्यंत पोहचविण्यासाठी कॅमऱ्याची नजर तिच्यावर असेल. तिचा पती स्टुअर्ट बिन्नी रॉयल चैलेंजर्स बॅँगलोरसाठी खेळेल. लग्नानंतर युवराजचा पहिला आयपीएलयुवराजने गेल्या वर्षीच लग्न केले आहे. त्याची पत्नी मॉडल आणि अभिनेत्री हेजल कीचला क्रिकेट जास्त आवडत नाही, मात्र आपल्या पतीचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ती क दाचित दर्शकांच्या गर्दीत दिसू शकते. कॅमेऱ्याच्या नजरा तिला शोधतीलच, यात तिळमात्र शंका नाही. युवराज सिंह सनराइजर्स हैदराबादसाठी खेळेल. हरभजनसाठी येईल गीताहरभजन सिंह मुंबई इंडियंससाठी खेळणार आहे. त्याची पत्नी गीता बसरादेखील चित्रपटांशी संबंधीत आहे. हरभजची हिंमत आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी ती दर्शकांच्या गर्दीत नक्की येऊ शकते. तिला शोधणारे कॅमेरे तयारच असतील. दिनेश कार्तिकची खेळाडू पत्नीदिनेश कार्तिकची पत्नी दीपिका पल्लिकल स्क्वेशची खेळाडू आहे. ती आपल्या क्रिकेट खेळाडू पतीसाठी नक्कीच दर्शकांच्या गर्दीत दिसेल आणि कॅमेरे तर तिच्याकडे नक्की फिरतीलच. कार्तिक गुजरातसाठी खेळणार आहे. मनोज तिवारीची मॉडल पत्नी सुषमामनोज तिवारीची मॉडल पत्नी सुषमा रॉयदेखील मॉडेलिंग जगताशी संबंधीत आहे. तिवारी पुण्यासाठी खेळणार आहे. सुषमादेखील तिच्या पतीसाठी दर्शकांच्या गर्दीत दिसू शकते. साक्षी ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदू आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच धोनी कॅप्टन नसेल. तो यावेळी स्मिथच्या कॅप्टनशिपमध्ये रायजिंग पुणेसाठी खेळेल. धोनीची पत्नी साक्षी जेव्हापण दर्शकांच्या गर्दीत पोहचते, त्यावेळी ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. यावेळीदेखील कॅमºयाच्या नजरा तिलाच शोधतील.