शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

OMG : ​घरातील "हे" उपकरणे ठरु शकतात धोकेदायक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2017 15:47 IST

घरातील कामे सहज आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रत्येकाच्या घरात विद्युत उपकरणे आहेत. मात्र घरातील हे उपकरणे निष्काळजीपणाने वापरल्यास कधी धोकेदायक ठरतील सांगता येत नाही

-Ravindra Moreघरातील कामे सहज आणि सुलभ व्हावेत म्हणून प्रत्येकाच्या घरात विद्युत उपकरणे आहेत. मात्र घरातील हे उपकरणे निष्काळजीपणाने वापरल्यास कधी धोकेदायक ठरतील सांगता येत नाही. आज आम्ही आपणास आपल्या घरातील अशाच धोकेदायक ठरु  शकणाºया उपक रणांविषयी माहिती देत आहोत. * वाटर हीटर बहुतेकजण अंघोळीच्या गरम पाण्यासाठी हीटरचा वापर करतात. बरेचजण निष्काळजीपणाने पाणी गरम करण्यासाठी अंथरुणाजवळच लावतात. अशावेळी आपल्या घरातील मुलांनी त्यामध्ये हात घातला, तर त्याला शॉक लागण्याचा धोका संभवतो.* वॉशिंग मशिन दिल्लीमधील रोहिणी परिसरात तीन महिन्याच्या जुळ्या भावांचा मृत्यु वॉशिंग मशिनमुळेच झाला. वॉशिंग मशिनमधले घुसळणारे पाणी पाहून लहान मुले त्याकडे आकर्षिले जातात. त्यामुळे वाशिंग मशिन लहान मुलांना धोकेदायक ठरु शकते. यासाठी वापरताना काळजीपूर्वकच वापरावे. * इस्त्रीआज प्रत्येकाला ऐटीत राहण्याची सवय झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात कपडे प्रेस करण्यासाठी इस्त्रीचा वापर होत आहे. मात्र इस्त्री वापरताना निष्काळजी केल्यास किंवा इस्त्रीमध्ये वीजेचा प्रवाह उतरल्यास इस्त्रीचा वापरही धोकेदायक ठरु शकतो. * टेबल फॅन सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उकाळ्यापासून मुक्ती मिळण्यासाठी बरेचजण टेबल फॅनचा वापर करतात. मात्र हा फॅन हा लहान मुलांसाठी घातक ठरु शकतो. या फॅनची पाती फिरत असताना मुले त्याकडे आकर्षिले जातात आणि जाळीच्या आत बोट घालण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना इजा होऊ शकते. * हेअर ड्रायर धावपळीच्या आयुष्यात सध्या प्रत्येकाच्या घरात हेअर ड्रायरचा वापर होताना दिसत आहे. मात्र हे हेअर ड्रायर आपल्या मुलांच्या हातात पडले तर त्यांच्यासाठी ते धोकेदायक ठरु शकते. हेअर ड्रायरमुळेदेखील अनेक दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.* गिझर गिझरदेखील तेवढेच धोकेदायक ठरु  शकते. गिझरचा स्फोट होण्याच्या घटना आपण ऐकल्याच असतील. यासाठी गिझरचा वापर नेहमी सावधगिरीनेच करायला हवा. * पॉवर प्लग/स्विचआज प्रत्येकाकडे विद्युत उपकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे पॉवर स्विचचा वापरही वाढतच आहे. मात्र हे पॉवर प्लग किं वा स्विच भिंतीवर अतिशय खाली लावत असाल तर ते आपल्या मुलांसाठी फार धोक्याचे ठरु शकते. कारण लहान मुलं खेळण्याच्या नादात त्याच्या छिद्रात बोटं घालू शकतो. यात मुलाला हाय व्होल्टेजचा वीजेचा धक्का त्याला बसू शकतो.