OMG : ‘या’ ८ वर्षीय बालकाची उंची आहे अमिताभ बच्चनपेक्षाही जास्त !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2017 09:53 IST
अमिताभ बच्चन सोबत काम करण्याची आहे इच्छा, कोण आहे हा मुलगा, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
OMG : ‘या’ ८ वर्षीय बालकाची उंची आहे अमिताभ बच्चनपेक्षाही जास्त !
मेरठ येथील एका ८ वर्षीय बालकाची उंची सुपरस्टार अमिताभ बच्चनपेक्षाही जास्त असून तो जगातील सर्वात उंच मुलगा ठरला आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक उंचीमुळे त्याची नुकतीच आणि त्याच्या आईच्या नावाची २००८ मध्ये गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. करण असे त्या मुलाचे नाव असून त्याची उंची ६ फूट ७ इंच तर त्याची आई स्वेतलाना यांची उंची ७ फूट २ इंच आहे. तर त्याचे वडील संजय सिंह यांचीही उंची फूट आहे. करणला लहानपणापासूनच वाढत्या उंचीमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्याला त्याच्या बरोबरीच्या मुलांसोबत खेळताही येत नाही. उंचीमुळे करणला समस्या आल्या असल्या तरी त्याला त्याचा फायदा होत आहे. त्याला जाहिरात कंपन्यांनी जाहिरातीत काम करण्याची आॅफर केली आहे. तसेच त्याला चित्रपटांच्या आॅफरही मिळू लागल्या आहेत. पण त्याला अमिताभसोबत चित्रपटात काम करायचे आहे. शिवाय जाहिरातीत काम करण्यासाठी त्याची बोलणी सुरू आहे. करणला योगा आणि खाणं याची खूप आवड असल्याचं स्वेतलाना यांनी सांगितलं. त्याला जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा तो योगा करीत असतो.