OMG : फेसबुकतर्फे प्रत्येक यूजर्सला पैसे कमविण्याची संधी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 12:14 IST
आपण फेसबुकचा वापर करीत असाल तर आपणास पैसे कमविण्याची मोठी संधी मिळणार आहे, करावे लागेल हे काम !
OMG : फेसबुकतर्फे प्रत्येक यूजर्सला पैसे कमविण्याची संधी !
-Ravindra Moreफेसबुक यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण फेसबुकचा वापर करीत असाल तर आपणास पैसे कमविण्याची मोठी संधी मिळणार आहे. फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करण्याच्या मोबदल्यात तुम्हाला पैसे मिळणार आहे. हो, हे खरे आहे. लवकरच फेसबुकवर नवे फीचर येणार आहे. त्या फीचरच्या माध्यमाने तुम्हाला पैसे कमविण्याची संधी मिळणार आहे. असे फीचर अगोदर यूट्यूबने दिले होते. आता फेसबुकवर हे फीचर दिसणार आहे.कशी करता येईल कमाईमीडिया रिपोर्टनुसार, यूजर्सद्वारा फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. किमान २० सेकंदांपेक्षा जास्त वेळ पहिल्या जाणाºया व्हिडिओवर जाहिराती मिळतील. जाहिरातींमधून मिळणारा पैसा यूजर्सला देण्यात येईल. फेसबुकने या कामाला मिड रोल अॅड फॉर्मेट असे म्हटले आहे.५५ टक्के होईल कमाई* व्हिडिओमधून होणारी ५५ टक्के कमाई अपलोड करणाºया यूजर्सला मिळेल आणि ४५ टक्के फेसबुकला.* यूट्यूबद्वारे व्हिडिओ अपलोड करून अशीच कमाई केली जाते.* ९० सेकंदाचा असायला हवा व्हिडिओयूजर्स जो व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचा टाइम कमीतकमी टाइम हा 90 सेकंदाचा असायला हवा. यासोबतच फेसबुक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गाईडलाईनही देऊ शकते. म्हणजे तूम्ही कोणत्या व्हिडिओवर पैसे कमाऊ शकतात आणि कोणत्या नाही हे फेसबुक ठरवेल.यापूर्वी फेसबुकने व्हिडिओला घेऊन असे प्रयोग केले आहे. २०१५ मध्ये, एक वेगळ्या व्हिडिओ सेक्शनला क्रिएट करून त्या पब्लिशरला ‘रेव्हेन्यू’ जनरेट करण्याची संधी दिली होती. २०१५ मध्येही टेस्टिंग मिड रोल अॅड इन लाईव्ह व्हिडिओ लॉन्च केला होता.व्हिडिओची लोकप्रियता पाहून उचलले हे पाऊलफेसबुकने हा निर्णय व्हिडिओ बघणाऱ्या यूजर्सची संख्या वाढत आहे हे लक्षात घेऊन फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये प्रत्येक दिवशी १०० मिलियन यूजर्सद्वारे हे व्हिडिओ पाहिले गेले, आतापर्यंत फे सबुकवर पूर्वीपासून अपलोड असणाऱ्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची अॅड आलेल्या नाहीत.Also Read : आता फेसबुकद्वारे करा जॉब अॅप्लिकेशन