शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ओबामांना वाय-फायची सुविधा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 08:45 IST

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्व सुखे जिथे लोळण घेतात, अशा व्हाईट हाऊसमध्ये काही समस्या आहे

जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि सर्व सुखे जिथे लोळण घेतात, अशा व्हाईट हाऊसमध्ये काही समस्या आहे, असे सांगितल्यास कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यातही व्हाईट हाऊसमधील प्रमुख असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनाही काही समस्या आहे, असे सांगितल्यास कुणीही हे अशक्य आहे, असेच म्हणेल. जगातील सर्वांत शक्तिमान पुरुष आणि अमेरिकेचे प्रथम नागरिक असलेल्या व्यक्तीसाठी तेथील प्रशासन सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देते. असे असतानाही ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल हे दोघेही व्हाईट हाऊसमधील वाय-फाय सेवेबाबत समाधानी नाहीत. याला कारणही तसेच आहे. व्हाईट हाऊसमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली आहे. मात्र काही ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे सर्व सेवा बंद ठेवाव्या लागतात. यामुळे काही ठिकाणी वाय-फाय उपलब्ध होते तर काही ठिकाणी ते वापरणे अशक्य होत असल्याने बराक ओबामा यांना मोबाईल एक्सेस मिळत नाही. जगातील सर्वांत शक्तीशाली नेत्याच्या सुरक्षेलाही सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याने सर्व ठिकाणी वाय-फाय सेवा दिल्या जाऊ शकत नाहीत, असे व्हाईट हाऊसचे सुरक्षा अधिकारी दबक्या आवाजात सांगतात.