आयफोनने गाठला शंभर कोटींचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2016 19:03 IST
अॅपलने आतापर्यंत शंभर कोटी आयफोन विक्री केल्याचे सीईओ टिम कूक यांनी सांगितले.
आयफोनने गाठला शंभर कोटींचा आकडा
गोष्ट तशी फार जुनी नाही. स्टीव्ह जॉब्सने २००७ साली जेव्हा जगासमोर आयफोन आणला तेव्हा स्मार्टफोन क्रांतीची खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. आज एक दशकानंतर कंपनी सीईओ टिम कूक यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. अॅपलने आतापर्यंत शंभर कोटी आयफोन विक्री केल्याचे त्यांनी सांगितले.शंभर कोटी आयफोन या जगात विकले गेल्याची बाब तशी खूप महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे १८०५ सालापर्यंत जगाची लोकसंख्यादेखील शंभर कोटी नव्हती. यावरून आयफोन विक्रीचा हा आकडा किती भव्य आहे, हे लक्षात येईल. थोडं डोक जर चालवलं तर लक्षात येईल की,* एका आयफोनचे वजन सुमारे ११३ ग्रॅम असते. म्हणजे शंभर कोटी आयफोनचे वजन ११.३ हजार कोटी किलोग्रॅम असेल, जे की एका निमिट्झ-क्लास मालवाहक विमानापेक्षा जास्त आहे.* आयफोनची जाडी सरसरी ७ एमएम मानली तर एकावर एक सर्व शंभर कोटी आयफोन ठेवले तर ७ हजार किमी उंच इमारत उभी राहिल. आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटर जमिनीपासून केवळ चारशे किमी अंतरावरून पृथ्वीभोवती घिरट्या मारते.* प्रत्येक आयफोनमध्ये साधारणपणे ०.०३४ ग्रॅम सोनं असते. म्हणजे शंभर कोटी आयफोनचा हिशोब लावला तर ३४ हजार किलोग्रॅम सोनं भरेल. ज्याची किंमत ९७.८ हजार कोटी रुपये एवढी होते.हे तर काहीच नाही. कारण आयफोनमध्ये सोन्याबरोरबच इतरही अनेक दुर्मिळ धातू वापरले जातात. त्यांची किंमत लावली तर डोके चक्रावून जाईल.