शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

​आता तुमचेसुद्धा ट्विटर अकाउंट होऊ शकते ‘व्हेरिफाईड’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 14:42 IST

आपण सर्व आता तो ‘निळा टिक’ मिळवण्यासाठी कंपनीला विनंती करू शकतो.

ट्विटर वापरणाऱ्या बहुतेक प्रत्येकाचेच एक स्वप्न असेल. ते स्वप्न म्हणजे आपल्या ट्विटर अकाउंटमध्ये तो ‘निळा टिक’ मार्क असावा. हा ‘निळा टिक’ मार्क असणारे अकाउंट हे व्हेरिफाईड असतात. म्हणजे ट्विटर स्वत: शहानिशा करून ते अकाउंट त्या व्यक्तीचेच आहे याची खात्री करते. आतापर्यंत केवळ सेलिब्रेटी आणि प्रसिद्ध लोकांचेच आकउंट व्हेरिफाईड  केले जात असत.परंतु आता प्रत्येक ट्विटर यूजर व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करू शकतो. म्हणजे आपण सर्व आता तो ‘निळा टिक’ मिळवण्यासाठी कंपनीला विनंती करू शकतो. त्यासाठी कंपनीने एक वेगळे अ‍ॅप्लिकेशन पेज बनवले असून तेथे जाऊन यूजर्स ट्विटरद्वारे अधिकृत व्हेरिफिकेशन करण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, विशिष्ट निकषांची पूर्ती केल्यावर व्हेरिफाईड यूजर म्हणून दर्जा मिळेल.त्यासाठी तुम्हाला तुमचा खरा मोबाईल क्रमांक, ईमेल, स्वत:द्दल सत्य माहिती, वाढदिवस, प्रोफाईल आणि हेडर फोटोज्, एक वेबसाईट आणि  ट्विट्स ‘पब्लिक’साठी केलेले असणे अशी माहिती सादर करणे आवश्यक आहे. यासोबतच तुम्ही ‘व्हेरिफाईड’ होण्यासाठी का म्हणून पात्र आहात याची कारणे आणि इतर अनेक पडताळणी प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. कंपनीच्या उपाध्यक्ष टिना भटनागर यांनी सांगितले की, यूजर्सना ट्विटरवर प्रभावशील लोक शोधणे सोपे जावे या उद्देशना आम्ही हा निर्णय घेतला आहे.पूर्वी ट्विटर कॉम्युनिटीवर पुरेसा प्रभाव असणाऱ्या यूजर्सना कंपनी स्वत: संपर्क साधून सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करत असे. संगीत, अभिनय, फॅशन, प्रशासन, राजकारण, धर्म, पत्रकारिता, मीडिया, खेळ, व्यापार आणि इतर प्रमुख क्षेत्राततील प्रभावशाली व्यक्तींचाच ढोबळ मानाने यात सामावेश केला जात असे.आपल्या नियमांमध्ये अमुलाग्र बदल करण्याचे धोरण कंपनीने अलिकडच्या काळात स्वीकारले आहे. मोठ्या लांबीचे व्हिडियो, १४० कॅरेक्टर्स अट वाढवणे अशा बदलांचाच पुढचा भाग म्हणून व्हेरिफि केशन प्रक्रिया सर्वांसाठी खुली करण्याच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे.