आता फ्रिज ठरवणार जेवणाचा बेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 22:45 IST
‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘लेबेहर’ या दोन कंपन्या मिळून असे स्मार्ट फ्रिज बनवत आहेत जे आपल्याला जेवणासाठी लागणाºया वस्तूंची खेरेदी आणि बेत ठरवण्यासाठी मदत करतील.
आता फ्रिज ठरवणार जेवणाचा बेत
स्मार्ट तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कामे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली यंत्र करू लागली आहेत. आता आपल्या स्वयंपाक घरातील ‘फ्रिज’सुद्धा स्मार्ट होऊ पाहतोय. ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि ‘लेबेहर’ या दोन कंपन्या मिळून असे स्मार्ट फ्रिज बनवत आहेत जे आपल्याला जेवणासाठी लागणाºया वस्तूंची खेरेदी आणि बेत ठरवण्यासाठी मदत करतील.मायक्रोसॉफ्टचे प्रमुख डेटा शास्त्रज्ञ व्यवस्थापक टी. जे. हेजन यांनी ब्लॉग पोस्टमध्ये माहिती दिली की, आम्ही रेफ्रिजरेटर/फ्रिजरमध्ये बसवण्या योग्य असे ‘स्मार्ट डिव्हाईस बॉक्स’ नावाचे कम्यूनिकेशन मॉड्यूल तयार करत असून ज्याद्वारे फ्रीज इंटरनेटशी जोडले जाईल. कंपनीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्यक ‘कोर्टाना’ प्रमाणेच या नव्या प्रणालीमध्ये ‘लर्निंग तंत्रज्ञान’ वापरण्यात येणार आहे.अंतर्गत कॅमेरे आणि ‘आॅब्जेक्ट रिकॉग्नेशन टेक्नोलॉजी’द्वारे फ्रिजमध्ये कोणते सामान आहे, कोणत्या वस्तू किती प्रमाणात आहेत याची माहिती ठेवण्यात येईल. इंटरनेटशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही फ्रिजमध्ये काय आहे हे कुठूनही पाहू शकता. वस्तूंच्या उपलब्धततेनुसार मग तुम्हाला काय खरेदी करण्याची गरज आहे अन् काय नाही हे कळू शकेल.ग्राहकांच्या सुविधेसाठी ‘स्मार्ट-डिव्हाईस’ प्रवर्गातील कोणत्याही उपकरणांमध्ये हे मॉड्यूलर्स बसवले जाऊ शकतील अशी रचना करण्याचादेखील कंपनीचा विचार आहे. सध्या तरी ही प्रणाली प्रायोगिक टप्प्यात असून ‘डीप लर्निंग टेक्नोलॉजी’च्या प्रगतीनुसार झपाट्याने अधिक प्रगल्भ आहे.