शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

​स्मार्टफोन शोधणार ‘नो सेल्फी’ झोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2016 20:03 IST

स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर?

सेल्फी घेणे आजकाल खूपच घातक बनले आहे. बैलांच्या शर्यती, खोलवर उडी मारणे अथवा पोकेमॉन गो सारख्या खेळातून हे समोर आले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नुकतेच मुंबई सेल्फी काढण्याच्या नादात काही मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. सेल्फी संदर्भातील अपघातांचे प्रमाण पाहता, भारतामध्ये नो सेल्फी एरिया वाढण्याची शक्यता आहे. रेल्वे प्लॅफॉर्म्स, हाय स्पीड ट्रॅफिक कॉरिडॉर या ठिकाणी नो सेल्फी एरिया घोषित करण्यासंदर्भात भारत सरकार विचार करते आहे. याचे कारण म्हणजे कोणतेही ठिकाण आता शाश्वत राहिलेले नाही, ते अधिक प्रमाणात धोकादायक झालेले आहे. छत आणि बाल्कनी यांचा अधिक धोकादायक जागांमध्ये समावेश होतो.सेल्फीची क्रेझच अशी आहे की, लोकांना कशाचेच भान राहत नाही. विशेष म्हणजे लोक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सोशल मीडियावर ‘हवा’ करण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे जर लोकांनाच त्यांच्या सुरक्षेची काळजी नसेल तर कमीतकमी तंत्रज्ञानाने तरी ती जबाबदारी घ्यायाला हवी नाही का?याच विचारातून एक संकल्पना पुढे येत आहे. म्हणजे स्मार्टफोननेच जर सेल्फीसाठी धोकादाय किंवा बंदी असलेल्या जागा ओळखून आपल्याला त्वरीत सजग केलं तर? ‘नो सेल्फी’ झोनमध्ये जर तुम्ही सेल्फी काढण्यासाठी फोन काढला तर आपला फोन तसे आपल्याला सांगेल.  फोनद्वारे कोणते क्षेत्र नो सेल्फी आहे, हे कळू शकते. संशोधक यावर काम करती पण तोपर्यंत धोक्याच्या ठिकाणी मोबाईलचा कॅमेरा बंद ठेवणे योग्य ठरेल. आपण आपलीच काळजी नाही घेणार तर कोण घेणार?