रोमिंग नहीं, नो इंटरनेट कनेक्शनसे डर लगता है
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 22:29 IST
सुमारे ३४.५ टक्के लोकांना प्रवासात मोबाईल नेटवर्क न मिळणे तर केवळ ६.९ टक्के लोकांना रोमिंगची चिंता असते.
रोमिंग नहीं, नो इंटरनेट कनेक्शनसे डर लगता है
प्रवासाला जाताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची चिंता सर्वात जास्त सतावते? या प्रश्नाचे उत्तर शोधायला गेले तर फार रंजक तथ्ये बाहेर पडतात. आता हेच पाहा ना, आपले देशबांधव प्रवासात रोमिंगची नाही तर इंटरनेट कनेक्शन मिळणार नाही याची जास्त धास्ती घेतात.याच अर्थ की, रोमिंगमुळे वाढणाऱ्या बिलापेक्षा लोकांना सोशल मीडियापासून दुरावले जाण्याची जास्त भीती वाटते. एका वेब ब्राऊजर कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, सुमारे ३४.५ टक्के लोकांना प्रवासात मोबाईल नेटवर्क न मिळणे ही सर्वात मोठी समस्या वाटते तर केवळ ६.९ टक्के लोकांना रोमिंगची चिंता असते.प्रवास करताना लोकांना इंटरनेटद्वारे जगाशी कनेक्टेड राहणे अत्यंत महत्त्वाचे वाटते. आपल्या कामाशी आणि मित्रपरिवाराशी अपडेट राहण्यासाठी ते इंटरनेट कनेक्शनवर अवलंबून असतात. ७.८ टक्के लोकांनी तर प्रवासात स्मार्टफोन हरवण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले. सुमोर ३२.८ टक्के भारतीय इंटरनेटचा वापर सोशल मीडियासाठी करतात तर २८.४ टक्के लोक जिथे जायचे आहे त्या जागेची माहिती शोधण्यासाठी नेट वापरतात.सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या लोकांपैकी १६.४ टक्के लोक कुटुंबाशी कनेक्टेड राहण्यासाठी, १७.२ टक्के जीपीएससाठी मोबाईल डेटाचा वापर करतात. विशेष म्हणजे पूर्ण दिवसभर व्यत्ययरहित इंटरनेट कनेक्शनसाठी १३.८ टक्के लोक उपाशी राहायला, ३३.६ टक्के एक सायंकाळची दारू सोडण्यासाठी तर २८.४ टक्के सहा तासासाठी बाथरुमला न जाण्यासाठी तयार आहेत.