शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'जेल'मधलं आयशॅडो; पापणी लवताच सगळे होतील घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 16:01 IST

नाकाचा शेंडा आणि डोळ्यातलं तेज समोरच्याला 'याड' लावू शकतं. स्वाभाविकच, चेहऱ्याच्या मेक-अपइतकाच डोळ्यांचा मेक-अपही 'मस्ट' आहे.

- गीता खेडेकर

'मुलगी नाकी-डोळी नीटस आहे हो', हे वाक्य अगदी पूर्वापार चालत आलंय. मुलींचं-स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्यात नाक आणि डोळे किती महत्त्वाची भूमिका बजावतात, हे त्यावरून सहज लक्षात येतं. नाकाचा शेंडा आणि डोळ्यातलं तेज समोरच्याला 'याड' लावू शकतं. स्वाभाविकच, चेहऱ्याच्या मेक-अपइतकाच डोळ्यांचा मेक-अपही 'मस्ट' आहे. हा मेक-अप सोपा आणि टिकाऊ करण्यासाठी 'जेल आयशॅडो' बाजारात दाखल झालं आहे. 

पावडरी टेक्श्चरमधलं आयशॅडो हे महिला मंडळाच्या मेक-अप बॉक्समधील अविभाज्य घटक झालं आहे. पण, ही जागा जेल आयशॅडो घेऊ शकतं. कारण, ते नेहमीच्या आयशॅडोपेक्षा जास्त वेळ टिकतं आणि अधिक उठूनही दिसतं. या आयशॅडोमध्ये चकाकणारी चमकीही महत्त्वाची असते. लहानशा डबीत, उभ्या बाटलीत किंवा चपट्या आयशॅडो पॅलेटमध्ये हे जेल आयशेडॉ उपलब्ध आहे. जेल आयशॅडो हे साध्या आयशॅडोप्रमाणेच सोप्या पद्धतीने लावले जाते. ब्रशने किंवा ब्रशचा वापर न करताही तुम्ही जेल आयशॅडो लावू शकता.

* जेल आयशॅडो  कसं लावावं -

>> तुम्हाला आवडणारी एखादी शेड निवडा. >> जेल आयशॅडो ब्रशने किंवा हाताने  पापणीवर लावा. >> जेल आयशॅडो लावताना ते कमी घ्या आणि हलक्या हाताने लावा. >> ते जास्त लावल्यास चमकीची चमचम पाहणाऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकते. >> याचा बेस क्रीमी असल्याने ते नीट पसरवा. >> यात चमकी असली तरी योग्य शेड्स निवडून ते सकाळीही  वापरता येऊ शकते.(टिप- सकाळी लावणारी शेड ही शक्यतो गडद रंगाची नसावी.) 

मॅट मेकअपच्या  ट्रेंडमध्ये जेल आयशॅडो अगदी उठून दिसते.  तुम्ही बोल्ड रंगाचे आयशॅडो लावणार असाल तर आधी बेसला एखादी मॅट न्यूड शेडची लिपस्टिक लावा. जेल आयशॅडो नीट पसरेल याची काळजी घ्या.  चकाकी असणाऱ्या या शेड्सवर  साजेसं असं मॅट आयलायनर लावून डोळ्यांच्या खाली मेटॅलिक काजळ किंवा लायनर लावलं तर तुमचा लुक एकदम झक्कास दिसेल. जेल आयशॅडो  हे लाँग लास्टिंग असल्याने त्याला सारखं  टच-अप  करायची गरज भासत नाही. गरज असल्यास  त्याच शेडला पार्ट न लावता त्याचा कॉन्ट्रास्ट शेड लावणं कधीही उत्तम. * मेकअप काढताना-मेकअप काढण्याच्यावेळी  क्लीन्सिंग मिल्क लावण्याआधी हा आय मेक-अप ओल्या टिश्यूने किंवा कापूस तेलात बुडवून काढा. त्यानंतर क्लीन्सिंग मिल्क वापरून संपूर्ण मेक-अप काढा. 

टॅग्स :fashionफॅशनWomenमहिला