शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

यंदाच्या हिवाळ्यात स्टाइलविषयी टिप्स हव्यात? वाचा सविस्तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 21:24 IST

style tips : लाल, गुलाबी किंवा पिवळा असे गडद रंग तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवू शकतात, पण प्लेन पांढरा किंवा काळा रंगही चांगला दिसू शकतो. 

हिवाळा जवळ येतोय आणि आपण त्याची पूर्ण तयारी करायला हवी. हिवाळा उंबरठ्यावर आला आहे आणि गरमागरम कॉफी आणि रोमान्स यांच्या या हंगामामध्ये ट्रेंडी दिसायचं असेल तर त्यासाठी तयारी करायची वेळ आली आहे. यंदाच्या हिवाळ्यात तुम्हाला फॅशनच्या बाबतीत सगळ्यांना पिछाडीवर टाकायचे असेल तर स्टाइलचे कोणकोणते पर्याय असू शकतात, त्याबाबत मडामच्या डिझाइन हेड पारिका रावल यांनी सांगितलेल्या टिप्स पाहूया...

फरचा विचार करून बघा तळपत्या उन्हाळ्यात फरचे कपडे घालण्याचा विचारही  असह्य वाटेल. पण या अत्यंत फॅशनेबल कपड्यांचे निरनिराळे प्रयोग करण्याची संधी तुम्हाला हिवाळ्यामध्ये मिळू शकेल. फरपासून बनवलेले कोट आणि जाकेट हे पर्याय तुम्ही निवडू शकता. हे पर्याय नको असतील तर गळ्याभोवती गुंडाळण्यासाठी साधा फर स्कार्फ निवडू शकता. 

लांब कोट नेहमीच खुलून दिसतात तुम्ही कोणताही ड्रेस घालायचा ठरवला तरी चालेल, त्यावर एक सुंदरसा लांब कोट घातलात तर अधिक खुलून दिसाल. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे सॉलिड कलर निवडू शकता किंवा फ्लोरल निवडू शकता किंवा लेपर्ड प्रिंट ठरवू शकता. स्टायलिंगसाठी हा उत्तम पर्याय आहेच, शिवाय हिवाळ्यातल्या थंडीपासूनही तुमचं संरक्षण होईल. 

स्वेटर वापरून निरनिराळे रंग परिधान करा तुम्हाला हवा असलेला हटके व कॅज्युअल लूक मिळण्यासाठी स्वेटर हा सर्वात लोकप्रिय आणि स्टायलिश पर्याय आहे. हिवाळ्यामध्ये सैलसर स्वेटर घातला की आपल्या लाडक्या व्यक्तीच्या मिठीत असल्यासारखं वाटतं. इतकंच नाही, आणखी छान दिसण्यासाठी तुम्ही इंद्रधनुष्यासारख्या गडद रंगांचा वापर करू शकता. तुमच्याकडे निरनिराळे छान छान स्वेटर असायला हवेत. 

निवांत दिवसासाठी लेयर्स हिवाळ्यातल्या एखाद्या निवांत दिवशी गरमागरम कॉफीचा आस्वाद घ्यायचा, आणि याबरोबरच छान दिसणाऱ्या लेयर्सचा विचार करायला हरकत नाही. थंडीपासून बचाव होण्यासाठी, तसंच हटके दिसण्यासाठी तुम्ही ऊबदार शर्ट, स्वेटशर्ट आणि स्वेटर हे पर्याय विचारात घेऊ शकता. 

लेदर जाकिट आणि डेनिम लेदर जाकेट हा पर्याय कधीही कालबाह्य होणार नाही. हे जाकेट राकट दिसतात, शिवाय तुमचं रूप आणखी ऐटदार बनवतात. पार्टीला जायचं असेल किंवा रोड ट्रिपला जायचं असेल, रूबाबदार दिसण्यासाठी लेदर जाकेट हा सुंदर पर्याय आहे. याबरोबरच, या जाकेटवर डेनिम चांगली दिसेल. इतकंच नाही, तुम्ही डबल डेनिमचाही (जीन्स व जाकेट) विचार करू शकता. डेनिम परिधान कशी करायची, याचे वेगवेगळे प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

फॉर्मल आणि फॅब कामासाठी बाहेर जायचं असेल किंवा मित्रमंडळींबरोबर किंवा कुटुंबीयांबरोबर फिरायला बाहेर जायचं असेल; ऐटदार कोट, स्वेटर, टॉप आणि ट्राउझर हा पर्याय कधीच तुम्हाला निराश करणार नाही. तुम्हाला फॉर्मल कपडे आवडत असतील तर ते नक्की निवडा. लाल, गुलाबी किंवा पिवळा असे गडद रंग तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक खुलवू शकतात, पण प्लेन पांढरा किंवा काळा रंगही चांगला दिसू शकतो. 

बूट्स वापराइतरांपेक्षा वेगळं दिसायचं असेल तर बूट हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो. आकर्षक बुटांमुळे तुमचे कपडे आणखी उठून दिसतात, शिवाय तुमच्यामध्ये एक आत्मविश्वासही दिसून येतो. यंदाच्या हिवाळ्यामध्ये गुडघ्यापर्यंतच्या लांब बुटांचा विचार करू शकता आणि त्यावरर लांब स्कर्ट घालू शकता. अँकल बूट किंवा मध्यम आकाराचे बूट असे अन्य पर्यायही तुमच्या कपड्यांबरोबर साजेसे दिसू शकतात. वेगवेगळे सण, उशिरा चालणाऱ्या पार्टी आणि इतरही कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घ्या. म्हणूनच, हिवाळा सुरू होण्यापूर्वी मदामेच्या कलेक्शनमधून या निरनिराळ्या फॅशनची निवड करा.

टॅग्स :fashionफॅशन