शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

मातृदिनानिमित्त मराठी कलाकारांच्या आईविषयी भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 21:34 IST

ठेच लागल्यास सर्वात पहिले येणारा आवाज म्हणजे “आई गं! ” आई म्हणजे आपल्या सर्वांना जवळची वाटणारी व्यक्ती आणि हक्काची मैत्रीण होय.

ठेच लागल्यास सर्वात पहिले येणारा आवाज म्हणजे “आई गं! ”आई म्हणजे आपल्या सर्वांना जवळची वाटणारी व्यक्ती आणि हक्काची मैत्रीण होय.  आपण सर्वजण आईचं महत्त्व जाणतोच पण आपण ते रोज व्यक्त करत नाही. परंतु आईसाठी खास करण्याची इच्छा तर सगळ्यांच्या मनात असते आणि ‘मातृदिनाच्या’ निमित्ताने आईविषयी प्रेम व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते.  याच गोड संधीचा फायदा मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील घेतला आहे. कोल्हापूरात सुरु असलेल्या मराठी सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग म्हणजेच MBCL मध्ये सहभागी असलेल्या मराठी कलाकारांनी आईविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  जरी कलाकार MBCLच्या निमित्ताने घरापासून, आईपासून लांब असले तरी त्यांच्या आईविषयी भावना व्यक्त करुन मातृदिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.भावना व्यक्त करताना कलाकार सांगतात,संगीतकार अजित परब म्हणाले, “प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं वरचं स्थान असतं. कलाकारांसाठी त्यांच्या करियरमध्ये आईचा जास्त पाठिंबा असतो.” तसेच आईसाठी त्यांनी ‘मैं कभी बतलाता नहीं...पर अंधेरे से डरता हूँ मैं माँ...’ हे गाणं समर्पित केलं. गायक मंगेश बोरगांवकरने ‘धन्य धन्य नारी जीवन...औरों को तू ही अर्पण... अपने लिए तू सोचे ना’ हे गाणं आईला समर्पित करुन “प्रत्येक मुलाचं आई म्हणजे सर्वस्व आहे” या शब्दांत आईविषयी भावना व्यक्त केली.अभिनेता हरिष दुधाडे सांगतो की, “भावना हा शब्द जिथून सुरु होतो ते श्रध्दास्थान म्हणजे आई. आईविषयीच्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. माझ्यातल्या आत्मविश्वास वाढवणारी माझी आई. आई ही साक्षात देव आहे.”आईविषयी जेवढे बोलू तितके कमीच...तरी आईविषयी बोलताना शब्द कमी पडतात. कमालच आहे ना ‘आई-मुलाच्या नात्याची’!!