मिनियन्स : नवीन स्टाईल स्टेटमेंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:09 IST
मुलींना तर हे कार्टून्स विशेष आवडतात
मिनियन्स : नवीन स्टाईल स्टेटमेंट
2015 मध्ये हॉलिवूडचा ‘मिनियन्स’ हा 3डी सिनेमा आला आणि लहान मुलांबरोबरच तरुण, प्रौढ आणि इतके च काय तर वृद्धांनाही या छोट्याशा कार्टून्सने वेड लावले. तरुणाई तर या मिनियन्सच्या प्रेमात पडली आहे. बाजारही मिनियन्सचे डिझाईन असलेल्या अनेक गोष्टींनी भरून गेले आहे. शाळेत जाणार्या मुलांसाठी मिनियन्सची दप्तरे, वह्या, स्टिकर्स अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत तर तरुणांसाठी तर अशा हजारो गोष्टी घेता येतात. मोबाईल कव्हर्स वर तर हमखास आजकाल मिनियन्स दिसून येतात.याशिवाय मिनियन्सचे किचन्स, साईड बॅग्स, हेडफोन्स, टी-शर्टस, डबे, स्वेटर्स, पेन्ड्राईव्हज, गॉगल्स, घड्याळे इतकच काय तर मिनियन प्रिंटेड सॉक्सही आजकाल विकत मिळतात. मुलींना तर हे कार्टून्स विशेष आवडतात आणि त्यांच्या म्हण्याप्रमाणे त्यांना ते ‘क्यूट’ही वाटतात. मिनियम्स अनेक प्रकारात उपलब्ध आहेत.