शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

​नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिएन महिला आहेत जगात सर्वात उंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2016 20:59 IST

नेदरलँड देशातील पुरुषांची सरासरी उंची १८३ सेंमी (६ फुट) तर लॅत्व्हिएन महिलांची सरासरी उंची १७० सेंमी (पाच फुट ७ इंच) एवढी असते.

जगातील सर्वांत उंच माणसं कुठे राहतात असे जर तुम्ही विचारले तर त्याचे उत्तर नेदरलँडमधील पुरुष तर लॅत्व्हिया देशातील महिला देणे गरजेचे आहे. कारण नुकतेच एका अध्ययानातून हे सिद्ध झाले आहे. नेदरलँड देशातील पुरुषांची सरासरी उंची १८३ सेंमी (६ फुट) तर लॅत्व्हिएन महिलांची सरासरी उंची १७० सेंमी (पाच फुट ७ इंच) एवढी असते.‘ई-लाईफ’ जर्नलमध्ये प्रकाशित या संशोधनामध्ये गेल्या शंभरवर्षांत १८७ देशांतील लोकांच्या उंचीमध्ये कसा व किती बदल झाला यावर अध्ययन करण्यात आले. त्यानुसार इराण आणि द. कोरियातील लोकांच्या उंचीमध्ये सर्वाधिक १६ - १८ सेंमीची सरासरी वृद्धी दिसून आली. विशेष म्हणजे अमेरिकेत हीच वाढ केवळ ६ सेंमी इतकीच आहे. १९१४ साली सर्वात उंच पुरुष व महिलांच्या क्रमवारी अमेरिकेचा अनुक्रमे तिसरा व चौथा क्रमांक होता. मात्र आता ३७ आणि ४२व्या क्रमांकापर्यंत अमेरिकेची घसरण झाली आहे.अध्ययनातून हे तर स्पष्ट झाले आहे की, उंचीच्या बाबतीत युरोपिअन देशांचा दबदबा आहे. परंतु १९१४ मधील आकडेवारीशी तुलना केली असता पाश्चिमात्य देशांमधील लोकांच्या सरासरी उंचीमधील वाढ ही समतल झाली आहे. जगातील सर्वात कमी उंचीचे पुरुष (सरासरी १६० सेंमी) पुर्व टिमॉर या देशात तर सर्वात कमी उंचीच्या महिला ग्वाटमाला देशात राहतात. शंभर वर्षांपूर्वीदेखील ग्वाटमालाचा क्र मांक खालून पहिलाच होता.संशोधनाचे सहलेखक आणि ‘इम्पेरिअ कॉलेज लंडन’चे जेम्स बेंथम यांनी माहिती दिली की, भारत, पाकिस्तान, बांग्लादेश यासारख्या द. आशियाई व सब-सहारन आफ्रि का देशांतील लोकांच्या उंचीमध्ये मागच्या शंभर वर्षांत विशेष अशी वाढ (सरासरी १ ते ६ सेंमी)  झालेली नाही. तसे पाहिले गेले तर सब-सहारन आफ्रिक न भागातील लोकांची सरासरी उंची सत्तरच्या दशकांनंतर घटली आहे.जगभरातील लोकांच्या उंचीमध्ये दिसून येणाऱ्या फरकामागे अनुवांशिकतेचे कारण असू शकते; मात्र आपले डीएनए अनेक कारणांपैकी एक आहेत असे संशोधकांचे मत आहे. प्रमुख संशोधक माजिद इझ्झाटी यांनी सांगितले की, आपली जनुके एवढ्या प्रचंड वेगाने बदलत नाही. तसेच संपूर्ण जगात त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक असतो असेदेखील नाही. म्हणून केवळ जीन्समुळे उंचीमध्ये फरक आढळतो असे म्हणता येणार नाही. अनेक कारणांपैकी ते एक आहे.