शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मीटिंग मॅनर्स हवाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:28 IST

कोणत्याही कार्यालयीन किंवा बिझनेस मीटिंगचे काही नियम असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मीटिंग मॅनर्स पाळायलाच हवेत. कारण आपण मीटिंगमध्ये स्वत:ला कसे प्रेझेंट करता यावरुन आपल्याविषयी धारणा तयार होते.

-रवीन्द्र मोरे कोणत्याही कार्यालयीन किंवा बिझनेस मीटिंगचे काही नियम असतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मीटिंग मॅनर्स पाळायलाच हवेत. कारण आपण मीटिंगमध्ये स्वत:ला कसे प्रेझेंट करता यावरुन आपल्याविषयी धारणा तयार होते. बऱ्याचदा मीटिंगदरम्यान आपल्याकडून कळत-नकळत चुका होत असतात. त्यामुळे मीटिंगदरम्यान सहकारी आणि बॉस यांच्यावर आपले बॅड इंप्रेशन पडते. नेमके मीटिंगदरम्यान कसे वागावे म्हणजेच मीटिंग मॅनर्स कसे असावेत याबाबत जाणून घेऊयात. * मीटिंगला वेळेवर पोहोचाकधीही मीटिंगला वेळेवर पोहोचा. कारण व्यक्तिमत्वाची ओळख वेळ पाळण्यावर होत असते. मीटिंगची वेळ न पाळल्यास बॅड मॅनर्स गणले जाते. त्यामुळे कोणत्याही मीटिंगसाठी वेळेत जा. यामुळे तुमचा प्रामाणिकपणा लक्षात येईल.* स्वत:चा परिचय व्यवस्थित द्यामीटिंगचा पहिला शिष्टाचार म्हणजे स्वत:चा परिचय व्यवस्थित देणे होय. बऱ्याचदा मीटिंगमधे एकमेकांचा परिचय नसतो, त्यामुळे आधी परिचय करायला हवा.  * मीटिंगचा अजेंडा ठरवामीटिंगला जाण्यापूर्वी ती कशाशी संबंधित आहे हे जाणून घ्या. संपूर्ण अभ्यास करून तयारी करा. पूर्वतयारी न करता मीटिंगमध्ये सहभागी होणे योग्य नाही. * नीट बसा बऱ्याचदा मीटिंग रूममध्येदेखील काही लोक आळश्यासारखे बसतात. त्यामुळे आपल्याकडे सहकाºयांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोे. असे बसणे योग्य दिसत नाही. यामुळे मीटिंगमध्ये असताना नीट बसा व नीट वागा. * फोन पाकिटात ठेवा मीटिंग दरम्यान बरेचजण फोन टेबलवर ठेवतात. मीटिंगदरम्यान फोन वाजल्यास ते शांतताभंग करणारे ठरते. त्यामुळे फोन शक्यतो पाकिटात ठेवा. शिवाय फोन सायलेंट मोडवर ठेवा आणि फोन उचलणे खूपच आवश्यक असेल तर मीटिंग रूममधून बाहेर येऊन फोन उचला. * योग्य वेळी प्रश्न विचाराआवश्यक असेल तेव्हा योग्य वेळी प्रश्न विचारा. निरर्थक प्रश्न विचारू नका. तसेच मीटिंग संपायच्या वेळी प्रश्न विचारू नका.