स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:38 IST
‘मॉडर्न आर्किटेक्चर’चा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे माँक उल्नस आर्किटेक्ट्सने तयार केलेले ‘ट्रॉलहस’ हे घर.
स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना
‘मॉडर्न आर्किटेक्चर’चा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे माँक उल्नस आर्किटेक्ट्सने तयार केलेले ‘ट्रॉलहस’ हे घर. लवकरच मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या ‘नॉर्डन क्रॉस’ भागात असणाऱ्या ‘शुगर बॉऊल’ या छोट्याशा खेड्यात ‘अल्पाईन मॉडर्निज्म’ पद्धतीने हे घर बांधण्यात आले आहे.मोठ्या कुटुंबासाठी ‘सेकंड होम’ म्हणून ते बांधण्यात आले आहे. सुमारे १५ लोक येथे राहू शकतात. हिवाळ्यात येथे सुमारे 800 इंच बर्फ पडतो.अशा असह्य वातावरणात घराला नुकसान होण्यापासून वाचविण्यासाठी कॅक्रीटच्या चौथऱ्यावर उभे असलेले हे घर जमिनीपासून थोडे उंचीवर आहे. उन्हाळ्यात या जागेचा वापर स्टोरेज म्हणून करता येऊ शकतो. आकाराने भव्य असलेल्या घराचा समोरील भाग नजरेला भावेल अशा तऱ्हेने अगदी साध्यापद्धतीने डिझाईन केलेला आहे. ऋतूनुसार हे घर स्वत:ला बदलत आहे असा यामुळे भास होतो. ‘ट्री हाऊस’च्या धरतीवर या घराचे डिझाईन बनविलेले आहे.‘स्कॅन्डिनेव्हिएन’ आर्किटेक्चरचा प्रभाव यावर स्पष्ट दिसतो. आसपासच्या वातावरणाशी मिसळून जाण्यासाठी बाह्य भागाला डांबराचा थर लावण्यात आला आहे. मोठ्या काचेच्या खिडक्यांमधूून बाहेरचा ‘बेस्ट व्ह्यूव्ह’ दिसतो तसेच सर्व घर सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघते.