जेटलींच्या कन्येचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:18 IST
राजकारणी व बडे उद्योगपती यांचे विवाहसोहळे नेहमी चर्चेत राहतात. अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुलगी सोनालीचा दिल्लीत विवाह सोहळा पार पडला.
जेटलींच्या कन्येचा विवाह
अर्थमंत्री अरुण जेटली यांची कन्या सोनाली व प्रसिद््ध वकील तथा उद्योजक जयेश बक्षी यांचा विवाह दिल्लीत मोठ्या थाटात पार पडला. स्वागत समारंभास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्रीगण, उद्योजक, बडे अधिकारी, चित्रपट स्टार्स उपस्थित होते. विविध पक्षांतील नेतेमंडळी, जेटलींचा मित्रपरिवार या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहरुख खान व नेही यांनी या कार्यक्रमात खास सादरीकरण केले. प्रसिद्ध पॉप गायक मिकासिंग याने या समारंभाची काही छायाचित्रे ट्विटरवर शेअर केली आहेत.source-indian express