सिडनीत विदाऊट मेकअप वावरल्या मराठी तारका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 04:31 IST
नुकतेच मराठी स्टार्स आॅस्ट्रेलिया वारी करून आले.
सिडनीत विदाऊट मेकअप वावरल्या मराठी तारका
नुकतेच मराठी स्टार्स आॅस्ट्रेलिया वारी करून आले. सिडनीत यावर्षाचा मिक्टा अवॉर्ड सोहळा उत्साहात झाला. यानिमित्ताने मराठी तारकांनी फावल्या वेळेत सिडनीत फेरफटका मारला, मात्र ग्लॅमरस अंदाजात नव्हे, तर विना मेकअप वावरतांना दिसल्या. अंकुश चाौधरी. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, अनिकेत विश्वासराव, अशोक सराफ यांच्यासह सई तामणकर, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, उर्मिला कानेटकर-कोठारे, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, अमृता सुभाष, केतकी माटेगावकर आदी तारका चक्क विना मेकअप दिसल्या. विशेष म्हणजे विना मेकअप सुद्धा सुंदर दिसत होत्या.