शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दसरा दिवाळीची तयारी आतापासून करा. आणि सणाच्या दिवशी सुंदर दिसा!

By madhuri.pethkar | Updated: September 21, 2017 19:05 IST

दस-याला अजून नऊ दिवस आहे. आणि दिवाळी अजून बरीच लांब आहे. तुम्ही ठरवलं तर दस-या दिवाळीपर्यंत तुमच्या चेहे-यावरची आणि केसांची हरवलेली चमक परत मिळू शकते. यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही खास सणांसाठी म्हणून आजपासूनच सुरू करू शकतात.

ठळक मुद्दे* जो परिणाम पार्लरमध्ये गोल्ड फेशिअल करून मिळतो त्यापेक्षा चांगला परिणाम सोन्याच्या अर्काचा उपाय केला तर होवू शकतो. सोन्याच्या अर्काचा उपाय केल्यास त्वचा पुर्नज्जिवित होते. त्वचेला तजेला येतो. आणि चेहे-यावरच्या वयाच्या खुणाही जातात.* चेहे-यावरची मृत त्वचा निघून गेली तर त्वचा नव्यानं श्वास घेवू शकते. ही मृत त्वचा निघून जाण्यासोबतच त्वचेचं पोषण होणंही गरजेचं असतं. यासाठी स्क्रबींग म्हणून तुम्ही काय वापरता हे महत्त्वाचं . यासाठी सुक्यामेव्याचा उपयोग केला तर फारच उत्तम.* चेहे-यासोबतच हात आणि पायही चमकायला हवेत. यासाठी जास्वंदीची फुलं कामास येतील.

 

- माधुरी पेठकरदसरा, दिवाळी आली की नटावसं वाटतं, छान तयार व्हावसं वाटतं. आजूबाजूचा परिसर, घर जसं चमकतं तशीच चमक आपल्या त्वचेवर आणि केसांवर यावी असं कितीतरीजणींना वाटतं. त्यासाठी खास दिवस राखून ठेवले जातात. पार्लरमध्ये जावून त्यासाठी स्पेशल ट्रिटमेण्ट घेतल्या जातात. यात थोडे थिडके नाही हजारो रूपये जातात. पण ही पार्लरमधून कमावलेली महागडी चमक शेवटी चार दिन की चॉंदणीच ठरते. सणावाराचे दिवस सरायच्या आतच ही चमक धूसर झालेली दिसते.अशी ब्यूटी ट्रीटमेण्टचा काय उपयोग?अजूनही वेळ गेलेली नाही. दस-याला अजून नऊ दिवस आहे. आणि दिवाळी अजून बरीच लांब आहे. तुम्ही ठरवलं तर दस-या दिवाळीपर्यंत तुमच्या चेहे-यावरची आणि केसांची हरवलेली चमक परत मिळू शकते.यासाठी काही उपाय आहेत जे तुम्ही खास सणांसाठी म्हणून आजपासूनच सुरू करू शकतात.सोन्याचा अर्कजो परिणाम पार्लरमध्ये गोल्ड फेशिअल करून मिळतो त्यापेक्षा चांगला परिणाम सोन्याच्या अर्काचा उपाय केला तर होवू शकतो. सोन्याच्या अर्काचा उपाय केल्यास त्वचा पुर्नज्जिवित होते. त्वचेला तजेला येतो. आणि         चेहे-यावरच्या वयाच्या खुणाही जातात.यासाठी दोन सोन्याची नाणी घ्यावीत. ती 100 मीलिलिटर पाण्यात सुमारे 20 मिनिटं उकळवावीत. नंतर गॅस बंद करून ती पाण्यात तशीच ठेवावीत. एका तासानंतर स्प्रेच्या बाटलीत ते पाणी भरावं. ते पाणी दिवसातून दोन वेळा चेहे-यावर स्प्रे करावं. या प्रयोगाला सोन्याची नाणी असलीच तर उत्तम नाहीतर चांदीची नाणीदेखील चालतील.

 

सुक्यामेव्याचं स्क्रबींग

चेहे-यावरची मृत त्वचा निघून गेली तर त्वचा नव्यानं श्वास घेवू शकते. ही मृत त्वचा निघून जाण्यासोबतच त्वचेचं पोषण होणंही गरजेचं असतं. यासाठी स्क्रबींग म्हणून तुम्ही काय वापरता हे महत्त्वाचं . यासाठी सुक्यामेव्याचा उपयोग केला तर फारच उत्तम.यासाठी अर्धा चमचा केशर 20 मिनिटं चार चमचे दुधात भिजवावं. 10 बदाम आणि 5 पिस्त्यांची पूड करावी. 5 अंजीर घ्यावेत. आणि थोड्याशा दुधात वाटावेत. नंतर केशर भिजवलेलं दूध घेवून सर्व घटक यात मिस्क्स करावेत. मिक्स करताना यात एक 2 चमचे चंदनाची पावडर घालावी. ही पेस्ट चेहे-यास लावावी.  वीस मिनिटानंतर चेहेरा स्वच्छ करावा. संत्र्याच्या रसात कापूस बुडवून चेहेरा पुसून घ्यावा. आणि त्वचा जर कोरडी असेल तर मग पाच चमचे पाणी घेवून त्यात एक चमचा मध घालावं. आणि त्या पाण्यात कापूस बुडवून स्क्रब काढावं. नंतर थंड पाण्यानं चेहेरा धुवावा.जास्वंदीच्या फुलांचा मसाज.

चेहे-यासोबतच हात आणि पायही चमकायला हवेत. यासाठी जास्वंदीची फुलं कामास येतील. दोन चमचे जास्वदींच्या फुलांची पेस्ट , दोन चमचे गुलाबांच्या पाकळ्यांची पेस्ट घ्यावी. एक चमचा साय घेवून या पेस्ट सायीत कालवाव्यात. हे मिश्रण मग हाता पायांवर लावावं. दहा मिनिटानंतर पाण्यानं हात पाय धुवून घ्यावेत.

 

केसांसाठी पॅक सुंदर दिसण्यात केसांचीही भूमिका महत्त्वाची असते. समजा केस खराब झाले असतील तर मग काही उपाय तातडीनं करायला हवेत. यासाठी केसांना नुसतं तेल लावून मसाज करणं पुरत नाही. केसांना पोषक तत्त्वं मिळतील असे पॅक आणि मास्क लावणं गरजेचं असतं. मास्कसाठी दोन चमचे आवळा पावडर , दोन चमचे मेथ्यांची पावडर, दोन चमचे रिठा पावडर, दोन चमचे शिकाकाई पावडर आणि दोन चमचे त्रिफळा पावडर घ्यावी. दोन अंड्याच्या बलकामध्ये किंवा योगर्टमध्ये या पावडर मिक्स करून पेस्ट बनवावी. ही पेस्ट केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावावी. 45 मिनिटं केसांवर ती तशीच राहू द्यावी. नंतर केस शाम्पूनं धुवावेत. हा उपाय आठवड्यातून एकदा करावाच.केसांचा मास्कयासाठी एक कप झेंडूच्या फुलांची पेस्ट, एक कप जास्वंदीची पानं आणि फुलांची पेस्ट आणि अर्धा कप गुलाबांच्या फुलाच्या पाकळ्यांची पेस्ट घ्यावी. हे सर्व एकत्र करून ही पेस्ट केसांना लावावी. वरून शॉवर कॅप घालावी. केस धुतांना शाम्पूमध्ये मुलतानी माती मिक्स करून केसांना लावावी. आणि केस धुवावेत.