शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

मोहक दिसायचंय मग ट्यूल आणि नेटला पर्याय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 17:48 IST

अलीकडे फॅशन जगतात नेट आणि ट्यूल या दोन्हीही कापडांना प्रचंड मागणी आली आहे. या कापडावर वेगवेगळे डिझाईन्स, वर्क करून किंवा साधे सिंपल बुट्टे, चिकनची फुलं वगैरे करूनही अत्यंत आकर्षक लुक देता येतो. मुख्य म्हणजे ही दोन्हीही कापडं पारदर्शक असल्यानं तोच त्यांचा यूएसपी ठरला आहे. त्वचा झाकूनही न झाकण्याचं कौशल्य या कापडांमध्ये आहे.

ठळक मुद्दे* या कापडावर वेगवेगळे डिझाइन्स, वर्क करून किंवा साधे सिंपल बुट्टे, चिकनची फुलं वगैरे करूनही अत्यंत आकर्षक लुक देता येतो.* ट्यूलचं कापड अत्यंत तलम आणि झुळझुळीत असतं. त्याला एक छानसा फ्लो असतो. त्यामानानं नेटचं कापड काहीसं स्टिफ असतं. शिवाय त्याला फ्लो नसतो. अलिकडे ट्यूलच्या स्कर्ट्सचीही जोरदार फॅशन आली आहे* ब्लाऊजच्या बाह्यांना, गळ्याला किंवा पाठीकडल्या थोड्याशा भागावर जर ट्यूल किंवा नेट लावलं तर कपड्यांना ब्यूटी टच मिळतो. साडीच कशाला एरवीही तुम्ही एखाद्या कुर्तीला किंवा तुमच्या पंजाबी ड्रेसच्या गळ्याला आणि बाह्यांना हे कापड वापरू शकता.

- मोहिनी घारपुरे-देशमुखजरतारीचा मोर असलेला शालू नी पैठणी प्रत्येक सणावाराला शोभूनच दिसते. पण नव्या काळात या पारंपरिक साड्यांनाही आकर्षक आणि मोहक लूक द्यायचा असेल तर त्यासाठी ट्यूल आणि नेटच्या कापडाचा वापर करता येईल. विशेषत: या कापडाचा वापर करून शिवलेले ब्लाऊज फारच सुंदर आणि आकर्षक दिसतात. विशेषत: ब्लाऊजच्या बाह्यांना, गळ्याला किंवा पाठीकडल्या थोड्याशा भागावर जर हे कापड लावलं तर कपड्यांना ब्यूटी टच मिळतो. साडीच कशाला एरवीही तुम्ही एखाद्या कुर्तीला किंवा तुमच्या पंजाबी ड्रेसच्या गळ्याला आणि बाह्यांना हे कापड वापरू शकता.पण त्याआधी ट्यूल आणि नेट हे नेमकं काय आहे हे माहिती असायला हवं.

 

ट्यूल आणि नेटमधला फरक 

ट्यूलचं कापड अत्यंत तलम आणि झुळझुळीत असतं. त्याला एक छानसा फ्लो असतो. त्यामानानं नेटचं कापड काहीसं स्टिफ असतं. शिवाय त्याला फ्लो नसतो. अलिकडे ट्यूलच्या स्कर्ट्सचीही जोरदार फॅशन आली आहे. पार्टीमध्ये जाताना, एखाद्या डेटवर जाताना मुली ट्यूल स्कर्ट्सलाच पसंती देत आहेत. विशेषत: या फॅब्रिकच्या प्रकारामुळे हे स्कर्ट्स जास्त लोकप्रिय होत आहेत. पूर्वी एखाद्या बाहुलीच्या फ्रॉकवर जे कापड सर्रास वापरलं जायचं तिथपर्यंतच ट्यूलचा प्रवास होता. मात्र अलीकडे फॅशन जगतात नेट आणि ट्यूल या दोन्हीही कापडांना प्रचंड मागणी आली आहे. या कापडावर वेगवेगळे डिझाईन्स, वर्क करून किंवा साधे सिंपल बुट्टे, चिकनची फुलं वगैरे करूनही अत्यंत आकर्षक लुक देता येतो. मुख्य म्हणजे ही दोन्हीही कापडं पारदर्शक असल्यानं तोच त्यांचा यूएसपी ठरला आहे. त्वचा झाकूनही न झाकण्याचं कौशल्य या कापडांमध्ये आहे. त्यामुळे तरूणींची पहिली पसंती नेट आणि ट्यूललाच असते.

 

 

सिल्क, नायलॉन आणि रेयॉनच्या सहाय्यानं बनवले जाणारे हे ट्यूल फॅब्रिक पार्टीवेअर गाऊन्स (म्हणजे आपल्याकडले झगे) साठीही फार मोठ्या प्रमाणावर पाश्चात्य देशात वापरले जातात. फ्रान्सच्या दक्षिणमध्य भागातील ट्यूल शहरावरून या कपड्याला हे नाव मिळालं आहे. 18 व्या शतकात हे शहर लेस आणि सिल्कच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होतं. तिथेच ट्यूलचंही उत्पादन झालं असावं असे काही संदर्भ सापडतात. मात्र, मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे ट्यूल हे बॉबीनेट प्रकारातील असते. ब्रिटनमध्ये 19 व्या शतकात त्याचा शोध लागल्याचे संदर्भ सापडतात. सर्वप्रथम हे कापड पर्शिअन बॅले कॉस्च्युम्सदरम्यान वापरलं गेलं असावं असा कयास आहे आणि त्यानंतरच ते सर्वत्र वापरलं जाऊ लागलं असं म्हटलं जातं.

भेटवस्तूंचं पॅकिंग

ट्यूल या कापडाचा उपयोग भेटवस्तूंच्या आकर्षक पॅकेजिंगसाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याचबरोबर लहान मुलींचे हेअरबेल्ट्स, शूज, स्कर्ट्स यामध्येही हा कापड प्रकार भरपूर वापरला जातो. यामुळे एक आकर्षकता त्या त्या कपड्याला किंवा भेटवस्तूला मिळते. अलीकडे बटव्यांचीही खूप फॅशन आली आहे, पारदर्शक, तलम बटव्यांमधून ओटीची देवाणघेवाण अनेक लग्नसमारंभात हमखास केली जाते. हे बटवेही या ट्यूलचेच.