शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

​महेश मांजरेकर एक ‘अफलातून’ व्यक्तिमत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 23:29 IST

मराठी चित्रपट इंडस्ट्रिच्या इतिहासात ‘नटसम्राट’ च्या रुपाने बॉक्स आॅॅफिसवर पहिल्यांदाच ४० कोटींचा गल्ला मिळवून देणाऱ्या आणि मराठी इंडस्ट्रिला अनेक  दैदिप्यमान शिखरं दाखविणाऱ्या महेश मांजरेकर नावाच्या ‘बाप’ माणसाला हे नवं विशेषण म्हणजे अतिशयोक्ती नव्हे. 

मराठी चित्रपट इंडस्ट्रिच्या इतिहासात ‘नटसम्राट’ च्या रुपाने बॉक्स आॅॅफिसवर पहिल्यांदाच ४० कोटींचा गल्ला मिळवून देणाऱ्या आणि मराठी इंडस्ट्रिला अनेक  दैदिप्यमान शिखरं दाखविणाऱ्या महेश मांजरेकर नावाच्या ‘बाप’ माणसाला हे नवं विशेषण म्हणजे अतिशयोक्ती नव्हे. १९८४ साली ‘अफलातून’ या नाटकाद्वारे आपली अभिनय कारकीर्द सुरु झाल्यानंतर केवळ मराठीत नव्हे, तर हिंदी, तामिळ, तेलगु, चित्रपटांमधून आपल्या जबरदस्त अभिनयाचा प्रभाव पाडणारा अभिनेता नेमका आहे तरी कसा? याचं कोडं भल्या-भल्यांना उलगडत नाही. महेश मांजरेकरांची पत्नी मेघा मांजरेकर या महेश बद्दल बोलताना म्हणाल्या, महेश वरवर कठोर वाटतात, पण आतून खूप चांगले व मृदु आहेत...म्हणजेच नारळ जसे वरुन टणक आणि आतून गोड असते. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती या तिन्ही क्षेत्रांना कोळून पिलेला हा अवलिया खरच असाच आहे.बिनधास्त तरीही सावध, फटकळ तरीही अभ्यासू, कठोर तरीही संवेदनशिल. हे सर्व विरोधाभासी गुण महेश मांजरेकरांसोबत काम करणाºयांना पदोपदी जाणवतात. ‘नटसम्राट’ च्या शूटिंगच्या वेळी दस्तुरखुद्द ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांना देखील याचा प्रत्यय आला. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात लीलया वावरणारे महेश मांजरेकर हिंदीतल्या आमिर खान प्रमाणेच मि. परफेक्शनिस्ट आहेत. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात उभे केलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि नुकत्याच येऊन गेलेल्या ‘बाजीराव मस्तानी’ मधील छत्रपती शाहू महाराजांचं पात्र असो, महेश मांजरेकर प्रत्येक भूमिका इतक्या समरसतेने आणि जीव ओतून करतात, की ते पाहून असं वाटतं की, महेश मांजरेकरांशिवाय त्या भूमिकेत कुणीच फिट बसलं नसतं. त्यांच्या वाट्याला जे ग्लॅमर मिळाले,त्यामागे महेश मांजरेकर यांची प्रचंड मेहनत आहे. आजवर अनेक  राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाली, स्क्रीन पुरस्कार मिळाले. मात्र या सर्वांच्या पुढे जाऊन महेश मांजरेकर मराठी पुरस्कार सोहळ्याची शान असतात. त्यामुळेच महेश मांजरेकर एक ‘अफलातून’ व्यक्तिमत्त्व आहे.