११ मार्चला ‘मॅड मॅक्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:51 IST
आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावलेल्या ‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ भारतात ११ मार्चला रिलीज होणार आहे.
११ मार्चला ‘मॅड मॅक्स’
आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात सर्वाधिक पुरस्कार पटकावलेल्या ‘मॅड मॅक्स फ्यूरी रोड’ भारतात ११ मार्चला रिलीज होणार आहे. जॉज मिलर दिग्दर्शित या चित्रपटाने आॅस्करमध्ये चांगलीच धमाल केली आहे. संपादन, प्रॉडक्शन डिझाइन, साउंड एडिटिंग, साउंड मिक्सिंग, कॉस्ट्यूम, मेकअप आणि हेअर स्टाइल आदी विभागात चित्रपटाला आॅस्कर मिळाले आहेत. चित्रपटाची निर्माता कंपनी वार्नर ब्रदर्सने भारतात थ्री डी आणि आयमॅक्स थ्री डी फॉर्मेटमध्ये चित्रपट रिलीज होणार असल्याचे जाहिर केले आहे. चित्रपटात टॉम हार्डी, चार्लीज थेरॉन, निकोलस हॉल्ट, हुग केस बेर्ने, रोसी हुटिंगटोन विटेले यांची प्रमुख भुमिका आहे.