शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
2
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
3
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
4
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
6
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
7
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
8
Lahore Blast: पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
9
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!
10
ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य
11
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
12
बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?
13
कुख्यात आतंकवादी हाफिज सईदचं तळच उडवलं! मिसाईल स्ट्राईकने मुरिदकेत हाहाकार; पाहा व्हिडीओ
14
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
15
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
16
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
17
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
18
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
19
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
20
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी

​लंडनचे रस्ते गजबजले सुपर लक्झरी कार्सने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 19:58 IST

सध्या लंडनच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी, फेरारी, पोर्शे, रोल्स रॉईस सारख्या कार्स हमखास पार्क केलेल्या आढळतील.

इंग्लंडमध्ये सध्या मस्त उन्हाळा आहे. जगभरातील पर्यटक सध्या लंडनमध्ये गर्दी करू लागले आहेत. यामध्ये आखाती देशातील गर्भश्रीमंत आणि राजघराण्यातील लोकांचादेखील सामावेश आहे. साऊदी अरेबिया, कुवैत येथून आलेले हे श्रीमंत पर्यटक एकटेच नाही आले तर सोबत सुपर लक्झरी कार्सचा ताफासुद्धा घेऊन आले आहेत. त्यामुळे सध्या लंडनच्या रस्त्यांवर लॅम्बोर्गिनी, फेरारी, पोर्शे, रोल्स रॉईस सारख्या कार्स हमखास पार्क केलेल्या आढळतील.Mercedes-Benz G63 AMG 6x6दरवर्षी उन्हाळ्यामध्ये लंडनमध्ये असा ‘सुपरकार’ मेळावा भरतो. सुट्या एंजॉय करण्यासाठी आलेल्या अतिश्रीमंत लोकांच्या लक्झरी कार्स तर आता आकर्षण ठरत आहेत. यातील बहुतांश कारर्सचे मालक अरब देशांतील व्यावसायिक आणि राजघराण्यातील लोक असतात. ते कतार, कुवैत, युएई येथून या कार विमानाद्वारे सुमारे पाच हजार किमी दूर थेट लंडनमध्ये पार्सल करतात. त्यासाठी येणारा १७ लाख रुपयांचा साधारण खर्च त्यांच्यासाठी काही विशेष नाही.Lamborghini Aventador लंडनमधील पॉश भागातील रस्त्यांवर डिझायनर दुकाने व हॉटेल्सच्या बाहेर एका मागे एक अशा ड्रीम कार्स पार्क केलेल्या पाहून कोणाला सुपरकार्स प्रदर्शन भरले की काय असा भास होईल.  यामध्ये मर्सिडिज-बेन्झ एसएलआर मॅक्लेरेन ७२२, फेरारी ४८८, लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटेडोर, रोल्स रॉईस, पोर्शे जीटी ३ अशा एकाहून एक महागड्या सुपरकार्स पाहायला मिळतात.Lamborghini Aventador