ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 08:19 IST
लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.
ओठांवर खुलून दिसणारे लिपस्टिक
भारतीय महिलांना लिपस्टिक विकत घेताना त्या डस्की स्कीनटोनसाठी आहेत का हे पाहून मगच त्या विकत घ्या किंवा अशा ब्रँडना प्राधान्य द्या जे खास करून भारतीय महिलांसाठी लिपस्टिक तयार करतात. असे केल्यामुळे लिपस्टिक निवडताना तुम्हाला असा रंग मिळेल जो तुमच्या चेहºयावर आणि ओठांवर खुलून दिसेल.अनेक जणी लिपस्टिकचा रंग निवडताना ती लिपस्टिक हाताच्या मागच्या बाजूला लावतात आणि हा रंग आपल्यावर चांगला दिसेल की नाही हे ठरवतात. पण असं करणं चुकीचं आहे. रंग निवडताना तो बोटांवर लावून पाहावा, कारण हाताच्या बोटांचा रंग आणि ओठांचा रंग किंचित मिळता जुळता असतो. शक्यतो आपल्या रंगापेक्षा दोन शेड्स गडद निवडाव्यात.भारतीय महिलांचा स्कीनटोन हा डस्की आहे, त्यामुळे लिपस्टिक निवडताना कॉपर, ब्राँझ, ब्राऊन बेरी अशा शेड्सना प्राधान्य द्यावे. लिपस्टिक लावल्याने चेहरा खुलून दिसायला हवा.