कॅन्सरग्रस्त मुलाची अंतिम इच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 07:48 IST
आपल्या कॅन्सरग्रस्त प्रियकराची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मुलीने त्याच्याशी लग्न केले.
कॅन्सरग्रस्त मुलाची अंतिम इच्छा?
जर तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला कॅन्सर सारखा भयानक आजार असला अन् तुम्हाला त्यासोबत लग्न करण्यास सांगितले तर तुम्ही लग्नासाठी होकार द्याल का? नक्कीच तुम्ही आपले आयुष्य खराब करणार नाही. मात्र आपल्या कॅन्सरग्रस्त प्रियकराची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एका मुलीने त्याच्याशी लग्न केले.ल्युक ब्लॅनॉक असे या कॅन्सरग्रस्त मुलाचे नाव आहे. त्याला 2013 साली कॅन्सर असल्याचे माहीत झाले होते. यानंतर मृत्यूशैय्येवर त्याने आपल्या वर्गमैत्रिणीबरोबर लग्न करण्याची इच्छा जाहीर केली होती. तिने देखील आपल्या प्रियकराची इच्छा पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. दोघांचा विवाह घरच्यांच्या व खास निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडला. या विवाह सोहळ्यानंतर ल्युकचा उत्साह थक्क करणारा आहे असे त्याचे काका पॅट्रिक म्हणाले. ल्युक शालेय जीवनात बास्केटबॉल आणि बेसबॉल चॅम्पियन आहे. त्याच्या लग्नाचा खर्च अनेक दानशूर लोकांनी उचलला आणि त्याचे लग्न हे शाही थाटात लावून दिले.