क्रिस्टनने पत्रकाराच्या कानशिलात भटकावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 16:34 IST
अभिनेत्री क्रिस्टन बेल तिच्या आगामी ‘द बॉस’ या चित्रपटाच्या विषयावरुन एका पुरुष पत्रकारावर प्रचंड भडकली. या पत्रकाराने तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत तिने त्याच्या श्रीमुखात भडकावुन, प्रश्नाचे उत्तर न देताच निघुन गेली.
क्रिस्टनने पत्रकाराच्या कानशिलात भटकावली
अभिनेत्री क्रिस्टन बेल तिच्या आगामी ‘द बॉस’ या चित्रपटाच्या विषयावरुन एका पुरुष पत्रकारावर प्रचंड भडकली. या पत्रकाराने तिच्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत तिने त्याच्या श्रीमुखात भडकावुन, प्रश्नाचे उत्तर न देताच निघुन गेली. ‘द फिक्स’चे पत्रकार केविन डोन्नेली याच्या वागणुकीमुळे क्रिस्टनला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.पत्रकार केविनने क्रिस्टनला ‘बॉस कोण आहे’ असा प्रश्न केला. त्यावर क्रिस्टनने त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळत बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकार केविनने तिच्यासमोर उभे राहून तिला ‘बेबी’ म्हणून संबोधले. केविनच्या या वागण्यामुळे क्रिस्टनला प्रचंड धक्का बसला. तिने कुठलाही विचार न करता त्याच्या कानशिलात लागवली.