शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

​पासवर्ड गुपित ठेवाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:17 IST

बऱ्याचदा आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना पासवर्ड किंवा पिन इतरांना सहजपणे सांगतो. मात्र हे अत्यंत धोक्याचे असून, आपली मोठी फसवणूक होऊ शकते. सध्या कॅशलेसचे वारे वाहू लागले असून, पासवर्ड किंवा पिन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

बऱ्याचदा आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरताना पासवर्ड किंवा पिन इतरांना सहजपणे सांगतो. मात्र हे अत्यंत धोक्याचे असून, आपली मोठी फसवणूक होऊ शकते. सध्या कॅशलेसचे वारे वाहू लागले असून, पासवर्ड किंवा पिन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. सध्या जवळपास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी आपल्याला पासवर्ड किंवा पिन लागतोच. उदाहरणार्थ, आपण क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून दुकानात खरेदी केली किंवा पेट्रोल भरले, तर तिथल्या माणसाने आपले कार्ड त्याच्याकडच्या यंत्रामध्ये ‘स्वाइप’ केल्यानंतर आपल्याला आपला ‘पिन’ भरावा लागतो. बऱ्याचदा लोक आपला ‘पिन’ सरळ त्या माणसालाच सांगतात आणि तो माणूस आपल्या वतीने त्या यंत्रात आपला ‘पिन’ भरतो. हे अत्यंत धोकादायक आहे. याचे कारण म्हणजे आपल्या कार्डावरचे तपशील अशा ठिकाणी काम करणारा चाणाक्ष माणूस लक्षात ठेवू शकतो. याच्या जोडीला आपण आपला ‘पिन’ ही त्याला सांगितला, तर आपल्या कार्डाची सुरक्षितता पूर्णपणे नष्ट होऊ शकते. तो माणूस या सर्व माहितीच्या आधारे आपल्या कार्डाचा गैरवापर करू शकतो. हाच प्रकार फोनवरूनही घडतो. सर्वसामान्य लोकांना भामटे फोन करून त्यांच्याकडून एटीएम किंवा डेबिट वा क्रेडिट कार्डांचे तपशील, पिन, मोबाईलवर येणारे वन टाइम पासवर्ड (ओटीपी) अशी माहिती घेतात. यासाठी आपण बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी ते करतात; किंवा फोनवरून पलीकडच्या माणसाला कसले तरी बक्षीस लागले असल्याची आणि त्यासाठी ही माहिती आवश्यक असल्याची थाप मारतात. लोक भीती किंवा हाव यापोटी ही माहिती सहजपणे देतात. अशाने आपली मोठी फसवणूक होऊन पश्चातापाची वेळ  येते हे नक्की. यासाठी आपला पासवर्ड, पिन आणि ओटीपी कधीही, कोणालाही सांगू किंवा दाखवू नका.