मिशेल ओबामांच्या अंगावर काश्मिरी कढाई असलेला ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 21:46 IST
क्युबाच्या राजकीय मेजवानीदरम्यान मिशेल यांनी घातलेल्या काश्मिरी कढाई असलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
मिशेल ओबामांच्या अंगावर काश्मिरी कढाई असलेला ड्रेस
अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा या सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत क्युबाच्या दौºयावर आहेत. या दौºयात क्युबाच्या राजकीय मेजवानीदरम्यान मिशेल यांनी घातलेल्या काश्मिरी कढाई असलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. मिशेल यांचा हा ड्रेस भारतीय-अमेरिकन ड्रेस डिझायनर नईम खान यांनी डिझाईन केलेला होता. हा ड्रेस भारतीय पोशांखांप्रमाणे होता. त्यावर काश्मिरी कढाईसोबतच भारतीय फुलांचे डिझाईनही होते. नईम यांनी मिशेल यांना दोन डिझायनर ड्रेस पाठवले होते. मिशेल कुठल्यावेळी कुठला ड्रेस घालणार याचा अंदाज नसतो. पण मिशेल यांनी नईम यांच्या एका ड्रेसला पसंती दिली. यापूर्वी २००९ मध्ये भारतीय मेजवानीदरम्यानही मिशेल यांनी नईम खान यांनी डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. ओबामांच्या मुली मालिया व साशा यांनीही यामहिन्यात कॅनडामध्ये नईम यांचेच डिझायनर ड्रेस परिधान केले होते.