करणच्या पार्टीत सावत्र 'मुली'सोबत पोहोचली करीना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 17:49 IST
बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने आपल्या जवळच्या मित्रांसाठी शनिवारी १८ जून रोजी रात्री एक पार्टी आयोजीत केली होती.
करणच्या पार्टीत सावत्र 'मुली'सोबत पोहोचली करीना
बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरने आपल्या जवळच्या मित्रांसाठी शनिवारी १८ जून रोजी रात्री एक पार्टी आयोजीत केली होती. विशेष म्हणजे या पार्टीत करीना कपूर सावत्र मुलगी सारा अली खानसोबत पोहोचली होती. सारा सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. ती लवकरच करण जोहरच्या आगामी सिनेमातून पदार्पण करणार आहे. याशिवाय नुकताच रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’चे मुख्य स्टार्स शाहिद कपूर, आलिया भट आणि करीना कपूरसुध्दा या पार्टीत सामील झाले होते. शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, सोनाक्षी सिन्हा, सुशांत सिंह राजपूत, सोहा अली खान, कुणाल खेमूसह अनेक दिग्गज कलाकार या पार्टीत आले होते.