इंग्रजी व्याकरणावरून जस्टीनला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 04:49 IST
हॉलीवुड गायक जस्टिन बीबरच्या ‘ब्रॉयफ्रेंड’ या गाण्यातील व्याकरणाच्या चुका एका ११ वर्षीय मुलांने लक्षात आणून दिल्या.
इंग्रजी व्याकरणावरून जस्टीनला सुनावले
हॉलीवुड गायक जस्टिन बीबरच्या ‘ब्रॉयफ्रेंड’ या गाण्यातील व्याकरणाच्या चुका एका ११ वर्षीय मुलांने लक्षात आणून दिल्या. ‘इफ आय वॉज यॉर बॉयफ्रेंड, आय वुड नेवर लेट यू गो’ या ओळीत एक व्याकरणाची चुक होती, मात्र एका मुलाने ही चुक लक्षात आणून दिली. मुलाच्या शिक्षकाने फेसबुकवर त्याचे पत्र पोस्ट केले. तसेच बीबरसारख्या रोल मॉडेलकडून अशाप्रकारच्या चुका होत असतील तर आम्ही काय आदर्श घ्यावा असेही त्याने यावेळी लिहले. तसेच बीबरने पुढच्या काळात इंग्रजीचा योग्य वापर करावा, असेही त्याला सुनावले.