शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोकेमॉनसाठी नोकरी सोडलेल्या तरुणाला मिळाले स्पॉन्सर आणि अनोख्या जॉबची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2016 14:24 IST

नुकतेच काही मिनिटांपूर्वी त्याने फेसबुकवर जाहीर केले की त्याला फिनलँडमधून स्पॉन्सरशिप मिळाली आहे.

आम्ही काही दिवसांपूर्वी तुम्हाला टॉम करी या तरुणाबद्दल सांगितले होते. न्यूझिलँडच्या टॉमने ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी चक्क नोकरी सोडली. सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याच्या ‘मिशन’ वर तो निघाला आहे. नुकतेच काही मिनिटांपूर्वी त्याने फेसबुकवर जाहीर केले की त्याला फिनलँडमधून स्पॉन्सरशिप मिळाली आहे. म्हणजे त्याला ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी कराव्या लागणार्‍या प्रवासाचा खर्च या स्पॉन्सरशिपमधून करण्यात येणार.एवढेच नाही तर अमेरिकेतील एका कंपनीने त्याला ‘पोकेमॉन गो कोच’ होण्याची जॉब आॅफर दिली आहे. मोबाईल गेम खेळण्यासाठी हातची चांगली नोकरी सोडल्यावर घरच्यांच्या विरोधाला त्याला सामोरे जावे लागले होते. परंतु जगभरातील मीडियाने त्याची दखल घेतल्यानंतर तो रातोरात ‘स्टार’ झाला. सोशल मीडियावर लोक त्याला शुभेच्छा देत आहेत. त्याची ‘फॅन फॉलोविंग’च तयार झाली असे म्हणा ना.फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये त्याने ‘तो त्याच्या पोकेमॉन गो प्रवासावर तयार करत असलेल्या डॉक्युमेंटरीचे टीझर उद्या चित्रित करणार आहे’ अशीसुद्धा माहिती दिली आहे. ‘लाईफ इज गूड’. आयुष्य एकदम मस्त चालू आहे, असे तो म्हणतो.टॉमला अनेक  नव्या लोकांना भेटण्याची तसंच विविध ठिकाणी फिरण्याची संधी मिळत आहे. 'मी अशा अनेक ठिकाणी फिरत आहे जिथे मला जाण्याची संधी मिळाली नसती', असं टॉम सांगितो. आता पाहूया त्याचा हा प्रवास त्याला कुठे कुठे घेऊन जातो.जपानमध्ये बर्‍याच प्रतीक्षेनंतर ‘पोकेमॉन गो’ लाँच झाला असून लवकरच भारतातही तो अधिकृतरीत्या उपलब्ध करून देण्यात येईल अशी शक्यता आहे.