शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

​पूर्ण वेळ पोकेमॉन खेळण्यासाठी त्याने सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 14:52 IST

न्युझिलँडमध्ये राहणाऱ्या टॉम कुरी या व्यक्तीने पूर्ण वेळ ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडली.

‘पोकेमॉन गो’ची क्रेझ आता सर्व सीमा तोडून लोकांच्या डोक्यात शिरली आहे. दररोज काही ना काही विचित्र व आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ‘पोकेमॉन गो’ गेमुळे किंवा त्यासाठी घडताना दिसताहेत. आता हेच पाहा ना. न्युझिलँडमध्ये राहणाऱ्या टॉम कुरी या व्यक्तीने पूर्ण वेळ ‘पोकेमॉन गो’ खेळण्यासाठी आपली चांगली नोकरी सोडली.आॅकलँडपासून जवळच असणाऱ्या हिबिस्कस कोस्ट येथे तो बारटेंडर म्हणून तो काम करत असे. तो म्हणतो, ‘गेममधील सर्व १५१ पोकेमॉन्स पकडण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी नोकरी सोडून पूर्णवेळ गेम खेळण्यासाठी देणार आहे. माझ्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला.’नोकरीचा राजीनामा देताना मॅनेजरला जेव्हा खेर कारण कळाले की, तेव्हा टॉमला शुभेच्छा देताना तो म्हणाल की, पोकेमॉन हंट ट्रीपसाठी बेस्ट लक. हा निर्णय तुझ्या फायद्याचा ठरो हीच सदिच्छा. टॉमच्या वडिलांनीदेखील त्याला मेसेज पाठवून त्याच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात, मला माहिती होतं टॉम की, तू एकदिवस खूप प्रसिद्ध होशील.आतापर्यंत टॉमने ९१ पोकेमॉन्स पकडले असून हे मिशन पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा प्रवास हा त्यातील सर्वात चांगला भाग आहे, असे तो म्हणतो. मी कधी ज्या ठिकाणी किंवा शहरांत गेलो नसतो तेथे या गेममुळे मी गेलो. नव्या लोकांशी भेटलो, त्यांच्याशी बोललो. हे माझ्यासाठी अत्यंत नवीन आणि एक्सायटिंग आहे.न्यूझिलँडमध्ये तो आता खूप प्रसिद्ध झाला आहे. लोक त्याला फेसबुकवर शुभेच्छा देतात. त्याला प्रोत्साहन देतात. तो म्हणतो लवकरच चाहते मला ‘फॅनमेल’ पाठवतील यात काही शंका नाही. यापूर्वी कधीही न अनुभवलेल्या पद्धतीने मी जगाशी जोडले गेलो. एकदा का मी सर्व पोकेमॉन्स पकडले की त्यानंतर मी आॅकलँडला परत जाऊन नोकरी शोधेन नाही तर नवा व्यवसाय करेन. माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय अनुभव मी घेत आहे. सो लेट्स एन्जॉय इट!!Photo Source : Facebook