जेटलींची नेहरू स्टाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 01:52 IST
नुकताच देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी आकाशी रंगांचा नेहरू कोट परिधान करून आपले वेगळेपण जपले. त्यांनी कोटच्या रंगाला साजेसाच हलक्या निळ्या रंगांचा कुर्ता आणि सफेद पायजमा असा लूक केला होता. तपकीरी रंगाची ब्रिफकेसही त्यांनी या दिवशी वापरली.
जेटलींची नेहरू स्टाईल
नुकताच देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी आकाशी रंगांचा नेहरू कोट परिधान करून आपले वेगळेपण जपले. त्यांनी कोटच्या रंगाला साजेसाच हलक्या निळ्या रंगांचा कुर्ता आणि सफेद पायजमा असा लूक केला होता. तपकीरी रंगाची ब्रिफकेसही त्यांनी या दिवशी वापरली. आतापर्यंत वेगवेगळ्या मंत्र्यांनी बजेटच्या दिवशी आपली विशेष छाप पाडण्यासाठी वेगळी स्टाईल केली होती. १९४७ साली पहिला अर्थसंकल्प सादर करणारे आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी बारीक उभ्या पट्ट्या असलेला पिनस्ट्रिप सुट (कोट) घातला होता. १९५० साली जॉन मथाई हे थ्री - पिस सूट आणि टाय घालून लोकसभेत सहभागी झाले होते.