मी जस्टीनला बोलते केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 23:56 IST
मी माझा आधीचा प्रियकर जस्टीन बायबरला बोलते केले, असा दावा पॉप स्टार सेलेना गोमेझ हिने केला आहे. ती ...
मी जस्टीनला बोलते केले
मी माझा आधीचा प्रियकर जस्टीन बायबरला बोलते केले, असा दावा पॉप स्टार सेलेना गोमेझ हिने केला आहे. ती म्हणते, डिसेंबर २0१0 पासून आमच्या जोडीबाबत खूप अफवा पसरविल्या जात होत्या. वेगवेगळ्य़ा चर्चामुळे अनेकदा आमच्याबद्दल बातम्या छापून आल्या. माय गर्ल या फिल्ममधील गाण्याच्या दरम्यान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली होती. लॉन्स एंजल्समध्ये हा कार्यक्रम झाला होता. त्यात पुन्हा एकदा आपण जस्टीनसोबत बोलल्याचे सेलेनाने म्हटले आहे. बायबरसोबतच्या रोमान्सबद्दल तिला विचारले असता, तिने प्रथम सर्वांची माफी मागितली. ती म्हणाली, मी प्रामाणिकपणे सांगते की, आमचे प्रेम हे कुठे प्रसिद्ध करण्यासाठी नाही. ते प्रामाणिक आहे. त्यातून मी त्याला बोलते केले. गोमेझच्या नव्या अल्बमचे उद््घाटन करण्यात आले. सेम ओल्ड लव असे या अल्मबमचे नाव असून, त्यातील अनेक गाणी रिलेशनशीपवर आधारित आहेत. अनेक चाहत्यांनी बायबरसोबत तिने घालवलेल्या काळातील ट्रॅकला पसंती दिली आहे. प्रत्येक गोष्ट बदलत असते. लोकांनी हे समजून घ्यायला हवे.