सुखी संसारासाठी हे कराच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:24 IST
पूर्वी महिला ही के वळ चुल व मूल यापुरतीच मर्यादित होती
सुखी संसारासाठी हे कराच...
अलीकडे ती प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर काम करीत आहे. तसेच अन्यायाविरोधातही आवाज उठवायला लागली आहे. त्यामुळे पुरुषापेक्षा सशक्त रुपाने महिला आज समोर येत आहे. त्यामुळेच लग्नानंतर पत्नीची काय प्रमुख भूमीका काय याची ही माहिती. काळजी घ्यावी : पत्नीने आपल्या पतीची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. तो जसा आपली व आपल्या क टुंबाची घेतो अगदी तशीच आपणी काळजी घ्यावी. प्रत्येक सुख व दुखात पतीला साथ देणे आवश्यक आहे. प्रॉब्लेम समजून घ्या : कोणत्याही परिस्थतीत पतीला मदत ही केलीच पाहीजे. कोणत्याही प्रसंगी काळजी घेऊन, प्रॉब्लेम समजून घेण्याचा नियमीत प्रयत्न करावा. निर्णय प्रक्रियेत सहभाग : महत्वाच्या निर्णयावेळी पत्नीनेही आपल्या पतीबरोबर निर्णय घ्यावला हवा. तिने आपले स्वत : काय मत आहे हे मांडणे आवश्यक आहे. त्यामुळे पतीही योग्य निर्णय घेऊ शकतो. पतीला पत्नी ही एक निर्णय प्रक्रियेतील सहकारी वाटायला हवी.अटीविना प्रेम करावे : पत्नीने कोणत्याही अटीविना आपल्या पतीवर प्रेम करावे. काही अटी ठेवून प्रेम करणे हे चुकीचे आहे. पतीकडून नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अपेक्षा ठेवू नका. त्यामुळे तुम्हाला कधीच खरे प्रेम मिळणार नाही. दबाव : पती व पत्नीनेही कधीही कोणत्याही कामासाठी एकमेकावर दबाव टाकू नये. अशा दबावामुळे मधुर नाताचे संबंधही दुरावतात. याची दोघेनेही काळजी घेणे आवश्यक आहे.