वाटतो तेवढा सोपा नाही ब्रेकअप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:02 IST
ब्रेकअपचे या तरुणांवर होणारे परिणाम पुढील स्वरुपात दिसून येतात.
वाटतो तेवढा सोपा नाही ब्रेकअप!
ब्रेकअपमुळे जोडपी नेहमी भावनिक तणावात वावरताना दिसून येतात. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडणेच टाळतात. तर काहीजण आठवण येऊ नये म्हणून एकांतात जाणे पसंत करतात. ब्रेकअप नंतर मुलं दुख लपविण्याकडे अधिक लक्ष देतात.स्वत: कडे लक्ष : यामुळे बे्रकअपनंतर व्यक्ति स्वत: कडे बघण्यासाठी वेळ देतो. एका वेगळ्या दृष्टीकोनातून तो पाहायला लागतो. व स्वत:ला वेळ देण्याचे महत्व त्याला कळून येते.जुन्या मित्रांची आठवण : मुले जेव्हा प्रेमात असतात, तेव्हा ते आपल्या मित्रांना वेळ देत नाहीपरंतू, ब्रेकअपनंतर त्यांना पुन्हा आपले जुने मित्र आठवू लागतात.सोशल मिडीयाचा अतिवापर : मुले आपल्या भावनाना इतरांपाशी बोलून दाखवीत नाहीत. परंतू, स्वत: व्यस्त ठेवण्यासाठी सोशल मिडीयावर जास्त वेळ घालवून, भावनीक पोस्ट पाठविण्याचे काम करतात.व्यायामाकडे लक्ष : ब्रेकपअ नंतर मुले जास्त करुन, जिमला जातात. आपली बॉडी बनावी,याकडे ते लक्ष्य केंद्रित करतात. त्यामुळे त्यांचा तणाव हा सुद्धा कमी होतो. आपली बॉडी चांगली असली तर दुसरी मुलगी आपल्याला मिळेल. अशा सुद्धा त्यांना यामागे आशा असते.पश्त्ताप : टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांचे , ब्रेकअप होतात. परंतू, त्यानंतर आपण हे पाऊल उचलयाला नको होते. असा पश्चात्ताप करण्याची वेळ मुलांवर येते. याकरिता हा तणाव दूर होण्यासाठी काहीजण वेगवेगळे पर्याय शोधीत असतात.