IPL Fever : बायकोला घाबरुन वीरेंद्र सेहवागने "असा" पाहिला पुणे-मुंबई सामना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 11:52 IST
बायकोच्या हट्टामुळे कालचा पुणे-मुंबई सामना वीरुला पाहता आला नसता, मात्र त्याने अशी शक्कल लढविली की बायकोचा हट्टदेखील पूर्ण झाला आणि आरामात त्याने सामनाचा आनंदही घेतला.
IPL Fever : बायकोला घाबरुन वीरेंद्र सेहवागने असा पाहिला पुणे-मुंबई सामना !
असे म्हणतात की, पुरुष कितीही मोठा सेलिब्रिटी किंवा उच्च पदावर असो त्याचे घरात बायकोपुढे काहिच चालत नाही. या उक्तीचा अनुभव आला टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला. बायकोच्या हट्टामुळे कालचा पुणे-मुंबई सामना वीरुला पाहता आला नसता, मात्र त्याने अशी शक्कल लढविली की बायकोचा हट्टदेखील पूर्ण झाला आणि आरामात त्याने सामनाचा आनंदही घेतला. गोष्ट अशी आहे की, वीरुची पत्नी-आरतीला बुधवारी संध्याकाळी चित्रपट पाहावयास जायचं होत. मात्र नेमके याच वेळी आयपीएल-१० मधील पुणे-मुंबईच्या प्ले आॅफची पहिली लढत होणार होती. विशेष म्हणजे काहीही करुन वीरुला हा सामना चुकवायचा नव्हता. त्याचा किंग्ज इलेव्हन पंजाब हा संघ स्पर्धेबाहेर गेला असला, तरी त्याला अगदी फायनलपर्यंत या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मात्र याच वेळी बायकोला चित्रपटदेखील दाखवायचा होता. कारण बायकोचं मन मोडायचं धाडसही नव्हतं. मग वीरूने एक शक्कल लढविली. बायकोबरोबर तो थिएटरमध्ये गेला खरा, पण तिथे सिनेमाऐवजी त्यानं आपल्या मोबाइलवर मॅच पाहिली.ही शक्कल आणि एक सुखी जीवनाचा मंत्र त्यानं ट्विटवरून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. पाहा काय आहे ते. }}}}