अभिनेता आणि होस्ट अमन वर्माच्या फॅन्सना त्याचं वेगळ्या रुपात दर्शन घडणार आहे.अमन वर्मा आता दाक्षिणात्य अवतारात पाहायला मिळणार आहे.. छोट्या पडद्यावरील आगामी अम्मा या मालिकेत शेखरन शेट्टी या दाक्षिणात्य डॉनची भूमिका अमन साकारणार आहे.मुंबईची लेडी डॉन जेनाबाई दारुवालीच्या जीवनावर ही मालिका आधारित असणार आहे. याच मालिकेत अमन ही दाक्षिणात्य भूमिका साकारतोय..या भूमिकेसाठी अमननं पूर्णपणे दाक्षिणात्य स्टाईलमध्ये ड्रेसिंग केलीय. त्याचा लूक, त्याची बोली सारं काही दाक्षिणात्य अंदाजातलं... गेल्या काही दिवसांपासून हैदराबादमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरु आहे.. या दाक्षिणात्य भूमिकेचा अमनवर असा काही परिणाम झालाय की सेटवर बोलतानाही तो तिची बोली बोलू लागलाय.. कोई मुझे खाना दो च्या ऐवजी त्याच्या तोंडून कोई मुझे काना दो असच निघत त्यामुळं म्हणावं लागेल की अय्यो... अमन....
अय्यो... अमन...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:25 IST