शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
3
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
4
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
5
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
6
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
7
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
8
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
9
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
10
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
11
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
12
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
13
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
14
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
15
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
16
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ
17
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
18
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
19
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
20
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

​बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 13:22 IST

२९ ते ३१ जुलै दरम्यान बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार आहे.

कलम ३७७ रद्द करून समलैंगिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी एलजीबीटी समुदाय मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सॉफ्टेवेअर सिटी बेंगलुरूमध्ये ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर आर्ट्स फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात येणार आहे. देशाविदेशातील अनेक ट्रान्सजेंडर कलाकार २९ ते ३१ जुलै दरम्यान बेंगालुरूच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट येथे होणाऱ्या या महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत. यामध्ये मंजम्मा जोगिथी यांच्या नेृतृत्त्वात कर्नाटकमधील जोगप्पा समुदायातील कलाकार,  संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेले पहिले ट्रान्सजेंडर कलाकार नर्तकी नटराज, मल्लिका गिरी पानीकर (सिंगापूर), वर्षा वर्धना (मलेशिया) आणि वासुकी वेल्कनो यांचा सामावेश असणार. महोत्सवात भरतनाट्यम, कुचिपुडी, मोहिनीयट्टम आणि कथ्थकसारखे शास्त्रीय नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे.महोत्सवात संगीत कॉन्सर्ट, काव्यवाचन, नाटक, कलाप्रदर्शनदेखील आयोजित केले जाणार आहे. महोत्सवाचा मुख्य हेतू हा लैंगिकतेविषयी सकारात्मक संदेश देणे, तिच्याविषयी असणाऱ्या समस्यांपेक्षा तिचे अस्तित्त्व साजरे केले जावे हा आहे. अतिशय काळजीपूर्वक प्रोफेशनल पद्धतीने महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. कलाकाराच्या निवडीमध्येही खूप लक्ष देण्यात आले.लोकांनी यावे, पाहावे आणि समजुन घ्यावे असे आम्हाला वाटते, असे आयोजकांनी सांगितले. केवळ एका महोत्सवाने बदल होणार नाही; पण ही एक सकारात्मक सुरूवात नक्कीच असेल.