INTERESTING : गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 14:49 IST
आपली मैत्रिणदेखील आपल्यासोबत गप्पा करताना संकोच करत असेल आणि जेव्हा भेटतात तेव्हा फक्त अबोला बाळगत असेल तर यामागे खालील कारणे असू शकतात. जाणून घेऊया या कारणांबाबत.
INTERESTING : गर्लफ्रेंडच्या नाराजीचे ही आहेत कारणे, जाणून घेतल्यास होईल फायदा !
असे म्हटले जाते की, महिलांना समजणे खूप कठीण काम आहे. हे काम अजूनही कठीण होते जेव्हा आपली बोलकी गर्लफ्रेंड अचानक आपल्यावर नाराज होऊन बोलणेच बंद करते. तिचा हा अबोला तिचे रडणे आणि चिडण्यापेक्षाही जास्त धोकेदायक ठरु शकतो. जर आपली मैत्रिणदेखील आपल्यासोबत गप्पा करताना संकोच करत असेल आणि जेव्हा भेटतात तेव्हा फक्त अबोला बाळगत असेल तर यामागे खालील कारणे असू शकतात. जाणून घेऊया या कारणांबाबत.* प्रेमात थोडेफार वाद सुरुच असतात. ही गरज नाही की तिच्या नाराजीचे कारण कायम तिची काही डिमांडच असायला हवी. तिच्या डोळ्यात झोकून पाहा. कदाचित तुमच्या चेहऱ्यावर वाढलेली दाढी तिला अजिबात आवडत नसेल म्हणून ती नाराज असेल. * जेव्हा आपला पार्टनर आपल्याशी नाराज असेल तेव्हा तो तुमच्याकडे अजिबात पाहणार नाही. तो फक्त तुमच्या प्रश्नाचे उत्तर फक्त मान हलवून देईल. आपल्या नात्यातील कोणत्याही प्रकारच्या वादापासून वाचण्यासाठी आपल्याला नाराजीच्या मुळापर्यंत जायायला हवे. प्रत्येक नात्यात संवाद होणे खूप आवश्यक आहे.* जर आपल्या नात्यात काही गोष्टी वेळेनुसार आणि ठरल्याप्रमाणे होत नसतील तर अशावेळी आपल्या पार्टनरला असे वाटू लागेल की, आपल्याशी नाते जुडवून खूप मोठी चुक झाली. ती आपल्याकडे पाहिल मात्र काहीच बोलणार नाही. याचा अर्थ असा की, अजून वेळ गेलेली नाही, आपण आताही नाते सांभाळू शकतात. * आपण एखाद्या सुटीच्या दिवशी सोबत बसुन गप्पा करीत असताना अचानक आपण तिला एखाद्या चांगल्या चित्रपटाचा क्लायमेक्स सांगता आणि ती हे ऐकून आपल्याकडे बराचवेळ एक टक पाहू लागते. याचा अर्थ असाही होऊ शकतो की, एखादे गुपित जे तिच्याशी जुडलेले आहे, ते तुम्हाला सांगण्यासाठी विचार करत असेल. जसे की एखाद्या बॉयफ्रेंडच्या संबंधीत एखादी गोष्ट. मात्र कदाचित तिच्यावर तुमचा विश्वास आहे की, नाही या विचारात ती गप्प असेल. Also Read : रिलेशनशिपमध्ये आहात का? आपल्यासाठी या आहेत खास ‘१०’ टिप्स !