शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

INTERESTING : जाणून घ्या, मुलींना कसे मुले आवडतात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 15:04 IST

आपण दिसायला स्मार्ट आहेत आणि तरीही मुली आपल्याकडे लक्ष देत नाहीत, तर आपल्या व्यवहारात काही बदल करा. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्याने मुली इंप्रेस होतील.

-Ravindra Moreतशी सर्वांची आपापली आवड-निवड असते मात्र काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येक मुलगी एका मुलामध्ये पाहणे पसंत करते. मुलींना कसे मुले आवडतात याचे उत्तर नाही आहे. मात्र विशेषत: मुलींना आदर करणारे, कोमल मनाचे आणि संस्कारी मुले जास्त आवडतात. याशिवाय कायम फ्रेश दिसणारे, आनंदी स्वभावाचे, प्रत्येकाचा सन्मान करणारे, सभ्यतापूर्वक वागणारे, प्रशंसा करणारे असे गुण असणारे मुलेदेखील मुलींना जास्त आवडतात. आपण दिसायला स्मार्ट आहेत आणि तरीही मुली आपल्याकडे लक्ष देत नाहीत, तर आपल्या व्यवहारात काही बदल करा. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत, ज्याने मुली इंप्रेस होतील. सभ्य मुलेबहुतांश मुली सभ्य म्हणजेच जेंटलमेन मुलांकडे जास्त आकर्षित होतात. जे स्वभावाने खूपच साधे आणि सरळ आहेत, मात्र गरज असेल तेव्हा आक्रमक ही होतील. मुलांचा सभ्यपणाच मुलींना आपल्याकडे आकर्षिक करतो. मुलींना लाजाळू मुलेही आवडतात. जर तो सर्वांशी लाजाळूपणाने वागतो, फक्त त्याच मुलीसमोर मनमोकळे बोलत असेल तर तिच्या ह्रदयात जागा बनविणे सोपे आहे. महिलांना चांगल्या व्यक्तीपेक्षा सक्षम मनुष्य बनण्याचा प्रयत्न करणारे पुरुष जास्त आकर्षक वाटतात. महिलांना व्यक्तिगत विकास पसंत आहे आणि त्या विचारशील तसेच संवेंदनशील पुरुष जास्त आवडतात. काळजी घेणारामुलींना काळजी घेणारा मुलगा जास्त आवडतो. काळजी घेण्याच्या प्रवृत्तीमुळे तिला नेहमी असे वाटते की, हा आपली नेहमी काळजी घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक मुलीला कूल डूड मुलेही जास्त आवडतात, शिवाय इंटेलएक्चु अल मुलेदेखील चांगले वाटतात. मग आतापासून पुस्तके वाचणे सुरु करा, यामुळे एखादी चांगली मुलगी तुम्हाला पसंत करायला लागू शकते. नेहमी प्रसन्न असणारामुलींना नेहमी प्रसन्न असणारे मुलेही खूप आवडतात. कारण आपल्या चेहऱ्यावरील चमकमुळे आपल्या स्वभावाची ओळख होते. जर आपला चेहरा नेहमी प्रसन्न असेल तर आपण जोशपूर्ण दिसता आणि यामुळेच मुली आकर्षित होतात. लोकांना फक्त हसणे माहित असेत, हसवणं नाही. मात्र जो आपल्या चेहऱ्याची नव्हे तर दुसऱ्याच्या चेहऱ्याची काळजी घेतो, असे मुले मुलींना विशेष आकर्षित करतात.   महिलांचा आदर करणारामुलींना महिलांचा आदर करणारे मुलेदेखील खूप आवडतात. महिलांना सन्मान दिल्याने आपले महिलांबद्दलचे विचार समजतात. मुलींना भावनिक मुलेही खूप पसंत पडतात, कारण भावनिक असेल तर तो आपल्यावर प्रेम करेल, मला समजून घेईल असे तिचे मत असते. शिवाय तिच्यातील उणिवा जाणून घेणाराही तिला जास्त आवडतो.तटस्थ मुलेविशेषत: मुली नेहमी अशा मुलांकडे लक्ष देतात जे त्यांना भाव देत नाहीत. असे मुले जे मुलींच्या बाबतीत तटस्थ असतात, त्यांना मुलींमध्ये खास रुचि नसते. जर मुलींना पाहून आपली तिच्याकडे लगेच वळण्याची प्रवृत्ती असेल तर सांभाळा आणि आपल्या भावनांना नियंत्रणात ठेवा. एकदमच मुलींसमोर असा व्यवहार करू नका, ज्यामुळे तिला समजेल की, तुम्ही तिला पसंत करता. आपल्यातील विश्वास काहीही करु शकतो. हाच विचार मुलींचाही असतो. केवळ स्वत:वर विश्वास ठेवणारे मुले मुलींच्या ह्रदयात स्थान निर्माण करतात. दबंगमुलींना मुलांचा दबंग स्वभाव आणि त्याच्यातला आत्मविश्वास खूपच आवडतो. संकुचित वृत्ती असणारे मुले तर मुलींना अजिबात आवडत नाहीत. यासाठी कधीही बोलताना लाजायचे नाही आणि स्पष्ट तसेच मनमोकळेपणाने आपले म्हणणे मांडायचे. संताप करणे वाईट गोष्ट नाही आहे, मात्र त्या संतापाला नियंत्रणात न ठेवणे सर्वात वाईट गोष्ट आहे. जर तिच्याशी गप्पा मारण्याची तुमची इच्छा असेल तर यात वाईट काहीही नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. खऱ्या गप्पा आणि जास्तवेळ बोलत राहणे दोघांमध्ये जवळीकता साधण्यास मदत करते.  गंभीर स्वभावाचास्वभावाने गंंभीर प्रवृत्तीचे मुले मुलींना खूप आवडतात. मुलींना जे आय लव्ह यू म्हणत त्यांच्या मागे फिरतात असे मुले अजिबात आवडत नाही. मुलींना विशेषत: आत्मविश्वासू मुले अधिक आवडतात. जर तुम्ही तिला आपल्या भावना एकदा सांगितल्या आहेत, तर प्रत्येक वेळी तिच्याकडून उत्तर मागू नका. ती काही कारणाने त्रस्त असेल तर तिला सल्ला देण्याऐवजी तिचे म्हणणे ऐका. असे केल्याने तुमचे नाते अधिक मजबूत होईल.