INTERESTING : असा शर्ट परिधान केल्यास मुली होतील आकर्षित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 13:21 IST
आपण पहिल्यांदाच एखाद्या मुलीला भेटायला जात असाल तर असा कोणता शर्ट परिधान करावा की ज्यामुळे ती आकर्षित होईल, असा विचार जर करीत असाल तर आम्ही आपणास खास टिप्स देत आहोत.
INTERESTING : असा शर्ट परिधान केल्यास मुली होतील आकर्षित !
कदाचित आपणास मुलींच्या अपेक्षा माहित नसतील, की त्यांना कसे मुले आवडतात. जर आपण पहिल्यांदाच एखाद्या मुलीला भेटायला जात असाल तर असा कोणता शर्ट परिधान करावा की ज्यामुळे ती आकर्षित होईल, असा विचार जर करीत असाल तर आम्ही आपणास खास टिप्स देत आहोत. सांगायला थोडे वेगळे वाटते मात्र हे खरे आहे की, आपल्या शर्टाच्या रंगापासून ते आपल्या आवडी निवडीपर्यंत मुलांच्या कित्येक वस्तूंवर मुली पहिल्या नजरेतच आकर्षित होतात. जर आपणही एखाद्या गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा विचार करीत असाल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.* काळजी करणाराकोणीतरी आपली खूप काळजी घेतो हे जाणून मुलींना खूपच चांगले वाटते. विशेष म्हणजे जेव्हा ती एकटी असते तेव्हा तुम्ही तिची घेतलेली काळजीबद्दल ती खूप विचार करते. अशा काही गोष्टी तिच्या मनाला स्पर्श करु न जातात. * चांगला परफ्यूममुलींना तर परफ्यूमचा सुगंध खूपच आवडतो यासाठी जेव्हाही त्यांच्यासमोर जाणार तेव्हा चांगला परफ्यूम लावूनच् जावे. * पांढऱ्या शर्टाची जादू विशेषत: मुलींना मुले पांढऱ्या शर्टामध्ये खूपच आकर्षित वाटतात. तर जेव्हाही मुलीला भेटायला जाणार तेव्हा पांढरा शर्ट परिधान करुनच जावे.